Maharashtra kesari: पुणे की, नगर? ठरलं महाराष्ट्र केसरी स्पर्धा कुठे होणार

Maharashtra kesari: महाराष्ट्र केसरी स्पर्धा शरद पवार गट घेणार की, रामदास तडस गट? या वादावर अखेर भारतीय कुस्ती महासंघाने आपली भूमिका स्पष्ट केली.

Maharashtra kesari: पुणे की, नगर? ठरलं महाराष्ट्र केसरी स्पर्धा कुठे होणार
wrestling
Follow us
| Updated on: Nov 27, 2022 | 8:32 AM

संजय दुधाणे, पुणे: प्रतिष्ठेची महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुण्यात होणार की नगरला?, महाराष्ट्र केसरी स्पर्धा शरद पवार गट घेणार की, रामदास तडस गट? या वादावर अखेर भारतीय कुस्ती महासंघाने आपली भूमिका स्पष्ट केली. संजयकुमार सिंग यांच्या अध्यक्षतेखाली अस्थायी समिती महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेईल. भारतीय कुस्ती महासंघाचे बी एन प्रसूद यांनी पत्रकार परिषदेत हे जाहीर केलं. पुण्यातील तडस गटाकडून होणारी स्पर्धा अस्थायी समिती घेणार आहे.

स्पर्धेच आयोजन कोण करणार?

नगरच्या कुस्ती स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंवर बंदीची कारवाई होऊ शकते. पुण्यातील स्पर्धेची घोषणा आधीच झाली होती. माजी महापौर मुरलीधर मोहोळ या स्पर्धेच आयोजन करणार होते. या स्पर्धेची निवड चाचणीची प्रक्रिया सुरु झाली आहे. महाराष्ट्र केसरी ही कुस्तीमधील मोठी मानाची स्पर्धा आहे. राज्यभरातील कुस्ती शौकीनांच या स्पर्धेकडे लक्ष असतं.

शरद पवार यांचही स्पर्धेला समर्थन

या निर्णयाचं पुण्यातील स्पर्धेचे आयोजक माजी महापौर मुरलीधर मोहोळ व गत महाराष्ट्र केसरी विजेत्यांनी स्वागत केले आहे. पुण्यात स्पर्धा व्हावी, अशी सर्व पेहलवानांची इच्छा होती. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली कुस्ती परिषदेची बैठक झाली. त्या बैठकीत रामदास तडस आणि काका पवार यांच्याकडे कुस्ती परिषदेची सूत्र देण्यात आली. एकप्रकारे शरद पवार यांनी या कुस्ती स्पर्धेला हिरवा कंदील दाखवलाय.

Non Stop LIVE Update
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.