MI IPL Retained and Released Players 2021 : सुरेश रैनाला शून्यावर बाद करणाऱ्या 19 वर्षीय काश्मिरी गोलंदाजाला मुंबई इंडियन्सचं आमंत्रण

लिलावापूर्वी फ्रँचायझीही छुप्या पद्धतीनं खेळाडूंचा शोध घेत आहेत.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 20:25 PM, 20 Jan 2021
MI IPL Retained and Released Players 2021 : सुरेश रैनाला शून्यावर बाद करणाऱ्या 19 वर्षीय काश्मिरी गोलंदाजाला मुंबई इंडियन्सचं आमंत्रण

नवी दिल्ली: आयपीएल 2021 (IPL 2021) ची तयारी सुरू झाली आहे. सर्व फ्रॅन्चायझींनी आज जवळपास खेळाडूंची यादी प्रसिद्ध केलीय. यानंतर बीसीसीआय पुढील महिन्यात मिनी लिलाव करणार आहे. लिलावापूर्वी फ्रँचायझीही छुप्या पद्धतीनं खेळाडूंचा शोध घेत आहेत, त्यासाठी त्या सय्यद मुश्ताक अली चषक स्पर्धेवर ( Syed Mushtaq Ali Trophy tournament) लक्ष ठेवून आहे. (MI IPL Retained and Released Players 2021 : cricket 19 year old pacer mujtaba yousuf called for trials by mumbai indians)

युसूफने जम्मू-काश्मीरच्या स्पर्धेत शानदार कामगिरी केली होती

या स्पर्धेत जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज ज्याने आपल्या गोलंदाजीने सगळ्यांनाच आकर्षित केलं होतं, त्यालाही मुंबई इंडियन्सने आवताण दिलंय. ग्रेटर काश्मीरच्या वृत्तानुसार 19 वर्षीय काश्मिरी गोलंदाज मुजताबा युसूफला मुंबई इंडियन्सनं ट्रायलसाठी बोलावलंय. दक्षिण काश्मीरच्या असलेल्या युसूफने जम्मू-काश्मीरच्या स्पर्धेत शानदार कामगिरी केली होती आणि 4 सामन्यांत एकूण 5 बळी मिळवले होते. विकेट घेण्याबरोबरच युसुफ या स्पर्धेत अत्यंत किफायतशीर गोलंदाजी करत असल्याचे सिद्ध झाले होते.

14 जानेवारीलाच मुजताबाने सुरेश रैनाला बाद करत खळबळ उडवून दिली होती

मुजताबाने त्याच्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आणि आता मुंबई इंडियन्सने त्याला ट्रायलसाठी बोलावले. स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये मुजताबाला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही, परंतु जेव्हा संधी मिळाली, तेव्हा त्याने चमकदार गोलंदाजी केली. नुकताच नेट गोलंदाज म्हणून मुजताबा देखील कोलकाता नाईट रायडर्सचा एक भाग होता. यापूर्वीही तो भारतीय शिबिराचा एक भाग आहे. गेल्या हंगामात त्याने वरिष्ठ क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यूपीविरुद्धच्या सामन्यात 14 जानेवारीलाच मुजताबाने सुरेश रैनाला बाद करत खळबळ उडवून दिली होती.

मुंबई इंडियन्सकडून 7 खेळाडू रिलीज

मुंबईने सात बड्या खेळाडूंना रिलीज केलं आहे. यामध्ये लसिथ मलिंगा, न्यूझीलंडचा मिचेल मॅग्केघन, ऑस्ट्रेलियाचा नॅथन कल्टर नाईल, जेम्स पॅटिन्सन, शेर्फन रुदरफोर्ड, फिरकीपटू बलवंत राय आणि वेगवान गोलंदाज दिग्विजय देशमुख यांना मुंबई इंडिन्सने आपल्या संघातून मुक्त केलं आहे.

सध्या 18 जण ताफ्यात

मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सध्या 18 खेळाडू आहेत. ज्या सात जागा रिक्त झाल्या आहेत, त्या येत्या आयपीएल लिलावात (IPL auction) भरल्या जातील, असं मुंबई इंडियन्सने म्हटलं. मुंबई इंडियन्स चार परदेशी खेळाडूंना आपल्या ताफ्यात समावेश करण्याच्या तयारीत आहे.

संबंधित बातम्या

MI IPL Retained and Released Players 2021 : मुंबई इंडियन्सची धाकधूक, मलिंगासह 7 खेळाडू मुक्त

MI IPL Retained and Released Players 2021 : cricket 19 year old pacer mujtaba yousuf called for trials by mumbai indians