IPL 2020 | सलामीच्या लढतीत चेन्नईपेक्षा मुंबईच वरचढ : गौतम गंभीर

आयपीएलच्या 13 व्या हंगामाला शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. कोरोनाचा सर्वत्र वाढता संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे आयपीएलवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. आयपीएलचा सलामीचा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज या दिग्गज संघांमध्ये खेळवला जाणार आहे. या सलामीच्या सामन्यात रोहित शर्माची मुंबई इंडियन्स कॅप्टनकूल महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जवर वरचढ ठरेल, असा विश्वास टीम इंडियाचा माजी सलामीवीर …

IPL 2020 | सलामीच्या लढतीत चेन्नईपेक्षा मुंबईच वरचढ : गौतम गंभीर

आयपीएलच्या 13 व्या हंगामाला शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. कोरोनाचा सर्वत्र वाढता संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे आयपीएलवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. आयपीएलचा सलामीचा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज या दिग्गज संघांमध्ये खेळवला जाणार आहे. या सलामीच्या सामन्यात रोहित शर्माची मुंबई इंडियन्स कॅप्टनकूल महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जवर वरचढ ठरेल, असा विश्वास टीम इंडियाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने व्यक्त केला. ( IPL 2020 in Dubai )

आयपीएलच्या 13 व्या हंगामाला शनिवार दि. 19 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिरात अर्थातच यूएईमध्ये सुरुवात होणार आहे. मुंबई इंडियन्सचे वेगवान गोलंदाज ट्रेण्ट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह यांचा सामना करणं चेन्नई सुपर किंग्ज यांच्यासाठी कठीण असेल. चेन्नईच्या संघात सुरेश रैनाचीही अनुपस्थिती चिंतेचा विषय असेल, असे गौतम गंभीर म्हणाला. ( IPL 2020 in Dubai )

दरम्यान चेन्नईमागे लागलेली अडचणींची मालिका काही थांबण्याचं नाव घेत नाही. सुरेश रैना आणि हरभजन सिंग या दोघांनीही वैयक्तिक कारणांमुळे यंदाच्या आयपीएल मौसमातून माघार घेतली. यासोबतच फलंदाज ऋतुराज गायकवाडलाही अद्याप काही दिवस विलगीकरणात राहावं लागणार आहे. त्यामुळे सलामीच्या सामन्यालाही तो मुकणार आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किग्जसाठी हा आणखी एक मोठा फटका आहे. या सर्व अडचणींचा सामना करत आयपीएलमध्ये टिकून राहणे चेन्नई सुपर किंग्जसमोरचं मोठं आव्हान असेल. ( IPL 2020 in Dubai )

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *