IPL 2020 Final MI vs DC | मुंबईकडे पाचव्यांदा जेतेपदाची ट्रॉफी, या 5 कारणांमुळे दिल्लीचा पराभव

अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) 05 गडी राखून दिल्लीवर (Delhi Capital) विजय मिळवला आहे.

IPL 2020 Final MI vs DC |  मुंबईकडे पाचव्यांदा जेतेपदाची ट्रॉफी, या 5 कारणांमुळे दिल्लीचा पराभव
Follow us
| Updated on: Nov 10, 2020 | 11:14 PM

दुबई : आयपीएल 2020 (IPL 2020) च्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) 05 गडी राखून दिल्लीवर (Delhi Capital) विजय मिळवला आहे. याविजयाबरोबरच मुंबईने पाचव्यांदा आयपीएल जेतेपद पटकावण्याचा मान मिळवला. दिल्लीने पहिल्यांदाच आयपीएलच्या फायनल मॅचपर्यंत धडक मारली होती. मात्र अंतिम सामन्यात बहारदार खेळी करण्यात दिल्लीच्या संघाला अपयश आलं त्यामुळे दिल्लीला पराभवाचा सामना करावा लागला. (Mumbai Indians winners IPL 2020 MI defeated DC Capitals by 5 wickets)

दिल्लीच्या पराभवाची 5 कारणे कोणती ते आपण पाहूयात……

फलंदाजांची हाराकिरी- दबावात दिसले, दिल्लीच्या पहिल्या 3 विकेट्स अवघ्या 4 षटकांमध्ये अंतिम सामन्यात टॉस जिंकून दिल्लीने प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. मात्र मुंबईच्या ट्रेन्ट बोल्टने डावाच्या पहिल्याच चेंडूवर स्टॉयनिसला आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये अजिंक्य रहाणेला स्टँडमध्ये पाठवलं. पहिल्या 4 षटकांमध्येच दिल्लीचे टॉप ऑर्डर बॅट्समन तंबूत परतले.

कमी रन्सचं टार्गेट, डिफेन्ड करण्यात अपयश टॉप ऑर्डर बॅट्समन निष्प्रभ ठरल्यावर कर्णधार श्रेयस अय्यर आणि विकेट किपर फलंदाज रिषभ पंतने दिल्लीचा डाव सावरला. मात्र वैयक्तिक 56 धावांवर पंत आऊट झाल्यावर दिल्लीच्या बॅटिंगला पुन्हा ग्रहण लागलं. एकीकडे कर्णधार श्रेयस अय्यर चांगली फलंदाजी करत होता मात्र दुसऱ्या बाजूने आणखी कुणी बॅट्समनने फटकेबाजी केली नाही. त्यामुळे दिल्लीला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं. निर्धारित 20 षटकांमध्ये दिल्लीला 7 गडी बाद 156 धावाच करता आल्या.

अंतिम सामन्यात दिल्लीच्या गोलंदाजांची निराशाजनक कामगिरी कमी रन्सचं टार्गेट असताना गोलंदाजांकडून दिल्लीच्या पाठीराख्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. पण मुंबईच्या फलंदाजांनी दिल्लीच्या गोलंदाजांना न जुमानता आपला आक्रमक खेळ चालूच ठेवला. एरव्ही भेदक मारा करणारा रबाडा आणि भल्याभल्या बॅट्समनना आपल्या फिरकीच्या तालावर नाचवणारा अश्विनला आजच्या मॅचमध्ये चमक दाखवता आली नाही.

आयपीएलच्या फायनल मॅचचा दबाव दिल्लीने आयपीएलच्या इतिहासात प्रथमच फायनलमध्ये धडक मारली होती. आजपर्यंत अशी कामगिरी दिल्लीला करता आली नव्हती. यंदाच्या मोसमात दिल्लीच्या युवा प्लेअर्सने चमकदार कामगिरी करत फायनलमध्ये जागा मिळवली. मात्र फायनलचा दबाव दिल्लीच्या खेळाडूंना झुगारून देता आला नाही. दिल्लीने अंतिम सामन्याचा अधिक दबाव घेतला, हे त्यांच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं.

अनुभवाची उणीव अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला अनुभवाची भरपूर उणीव भासली. दिल्लीच्या संघात युवा खेळाडूंचा भरणा होता. तुलनेने अनुभवी खेळाडू कमी होते. त्यामुळे युवा खेळाडूंना मोठ्या मॅचमध्ये खेळताना काय गोष्टींची काळजी घ्यावी लागते, याचा अंदाज दिल्लीच्या खेळाडूंना आला नाही.

(Mumbai Indians winners IPL 2020 MI defeated DC Capitals by 5 wickets)

संबंधित बातम्या

IPL 2020 Final, MI vs DC Live Updates : हिटमॅन रोहित शर्माचे धमाकेदार कामगिरी, मुंबईचा दिल्लीवर 6 विकेट्सने ‘इशान’दार विजय, पाचव्यांदा पटकावलं आयपीएलंच विजेतेपद

IPL 2020 Final MI vs DC : हिटमॅन रोहित शर्माची आयपीएल फायनल सामन्यांमधील कामगिरी

IPL 2020, Qualifier 1, MI vs DC : जसप्रीत बुमराहची कमाल, दिल्लीवर 57 धावांनी मात, मुंबईची सहाव्यांदा फायनलमध्ये धडक

IPL FINAL 2020, MI vs DC : पर्पल कॅपसाठी कगिसो रबाडा आणि जसप्रीत बुमराहमध्ये कडवी झुंज

Non Stop LIVE Update
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.