IPL 12 साठी अनिल कुंबळेंची ड्रीम टीम, विराट कोहलीला स्थान नाही

IPL 12 साठी अनिल कुंबळेंची ड्रीम टीम, विराट कोहलीला स्थान नाही

मुंबई : यंदाच्या आयपीएल मोसमात जवळपास प्रत्येक सामना अत्यंत रोमांचक झालाय. या मालिकेत आता क्वालिफायर दोन आणि फायनल हे दोनच सामने उरले आहेत. दुसऱ्या क्वालिफायरमध्ये विजय मिळवणाऱ्या संघाचा सामना फायनलमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध होईल. क्वालिफायर दोनमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात लढत होणार आहे. याचदरम्यान टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी त्यांची ड्रीम टीम निवडली आहे.

अनिल कुंबळे यांच्या ड्रीम टीमची चर्चा होण्याचं कारण म्हणजे, त्यांच्या टीममध्ये अनेक दिग्गज खेळाडूंना संधी देण्यात आलेली नाही. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीलाही त्यांच्या टीममध्ये स्थान नाही. या टीममध्ये चार परदेशी खेळाडू आहेत, तर सात भारतीय खेळाडूंना स्थान दिलंय. विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड झालेल्या चार खेळाडूंचा या ड्रीम टीममध्ये समावेश आहे.

कुंबळे यांच्या टीममधून विराट कोहली, रोहित शर्मा आणि शिखर धवन यांचं नाव गायब आहे. आयपीएलमध्ये धावांचा पाऊस पाडणारा सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नर आणि स्फोटक फलंदाज केएल राहुलला त्यांच्या संघात स्थान दिलंय. याशिवाय दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार याची मधल्या फळीतील फलंदाज म्हणून निवड केली आहे. यष्टीरक्षक म्हणून युवा फलंदाज रिषभ पंतऐवजी महेंद्रसिंह धोनीला स्थान देण्यात आलंय. विशेष म्हणजे धोनीला कर्णधारपद देण्यात आलंय.

या आयपीएलमध्ये सर्वात स्फोटक फलंदाज करणारे दोन अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल आणि मुंबई इंडियन्सचा हार्दिक पंड्या यांचाही टीममध्ये समावेश आहे. गोलंदाज म्हणून राजस्थान रॉयल्सचा श्रेयस गोपाल आणि चेन्नई सुपरकिंग्जचा इम्रान ताहीर यांचा कुंबळेंच्या टीममध्ये समावेश आहे.

वेगवान गोलंदाज म्हणून या ड्रीम टीममध्ये मुंबई इंडियन्सचा जसप्रीत बुमरा आणि दिल्ली कॅपिटल्सचा कॅगिसो रबाडा यांचा समावेश आहे. कॅगिसो रबाडाने या आयपीएलमध्ये 12 सामन्यात 25 विकेट घेत गोलंदाजांमध्ये पहिला क्रमांक मिळवलाय.

अनिल कुंबळे यांची ड्रीम टीम

डेव्हिड वार्नर, केएल राहुल, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, एमएस धोनी (कर्णधार आणि यष्टीरक्षक), आंद्रे रसेल, हार्दिक पंड्या, श्रेयस गोपाल, इम्रान ताहीर, कॅगिसो रबाडा आणि जसप्रीत बुमराह.

विश्वचषकासाठी भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, विजय शंकर, एमएस धोनी (यष्टीरक्षक), केदार जाधव, दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा, हार्दिक पंड्या, मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा

Published On - 8:08 pm, Thu, 9 May 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI