Sagar Rana Murder | सागरला मारहाण करताना सुशील कुमार सीसीटीव्हीत कैद, योगगुरुच्या आश्रमात लपल्याचा दावा

आरोपींपैकी सुशील कुमारचा निकटवर्तीय भुरानेच हरिद्वारमधील एका योगगुरुच्या आश्रमापर्यंत आपण सुशीलला सोडून आल्याची कबुली पोलिसांना दिली (Sushil Kumar CCTV Sagar Rana )

Sagar Rana Murder | सागरला मारहाण करताना सुशील कुमार सीसीटीव्हीत कैद, योगगुरुच्या आश्रमात लपल्याचा दावा
Wrestler Sushil Kumar
Follow us
| Updated on: May 13, 2021 | 1:02 PM

नवी दिल्ली : ऑलिम्पिक पदक विजेता पैलवान सुशील कुमार (Sushil Kumar) याच्याविरोधात पैलवान सागर राणा हत्या प्रकरणी (Sagar Rana Murder ) लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. त्यातच सुशील कुमार सागरला मारहाण करताना सीसीटीव्हीत कैद झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. सुशील कुमार एका बड्या योगगुरुच्या आश्रमात लपून बसल्याचाही दावा केला जात आहे. (Olympics Medalist Wrestler Sushil Kumar caught on CCTV while assaulting Sagar Rana allegedly hidden with Yoga Guru)

सुशीलच्या मित्रानेच बिंग फोडलं

दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये (Chhatrasal stadium) झालेल्या वादावादीनंतर पैलवानांच्या दोन गटात तुफान हाणामारी झाली होती. यात जखमी झालेल्या 23 वर्षीय सागर राणा या पैलवानाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी दिल्ली पोलिस सुशील कुमारसह वीस आरोपींच्या मागावर आहेत. यापैकी काही जणांना रोहतकमधून ताब्यात घेण्यात आलं आहे. आरोपींपैकी सुशील कुमारचा निकटवर्तीय भुरानेच हरिद्वारमधील एका योगगुरुच्या आश्रमापर्यंत आपण सुशीलला सोडून आल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. दैनिक जागरण या वृत्तपत्राने यासंबंधी बातमी दिली आहे.

भुराच्या कबुलीवर पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. भुरा पोलिसांची दिशाभूल तर करत नाही, याचा तपास केला जात आहे. भुरा पैलवानी करत असून ऑलिम्पिक पदक विजेता पैलवान सुशील कुमार याचा खास मित्र आहे. याशिवाय भूपेंद्र आणि अजयही सुशीलचे जीवलग आहेत. अजयचे वडील काँग्रेस नगरसेवक असल्याचा दावा केला जातो. तर भूपेंद्र विरोधात फरिदाबादमध्ये अवैध शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हाही दाखल आहे.

भुराने पोलिसांना काय सांगितलं?

छत्रसाल स्टेडियमवर 4 मे रोजी उशिरा कुस्तीपटू सागर राणाची हत्या केल्यानंतर सुशील कुमार आणि इतर पैलवान वेगवेगळ्या ठिकाणी लपले, असा दावा भुराने केला आहे. यानंतर प्रत्येकाने दिल्लीतून पळून जाण्याची योजना आखली आणि त्यासाठी सुशीलने भुरालाही बोलावलं होते. तो सुशीलला योगगुरुच्या हरिद्वारमधील आश्रमापर्यंत सोडून आला. यानंतर, भुरा परत आला आणि सुशीलने त्याचे सर्व फोन बंद केले. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांना सुशीलचे शेवटचे मोबाईल लोकेशनही हरिद्वारमधील सापडले आहे. (Sushil Kumar CCTV Sagar Rana )

सीसीटीव्हीत सुशील कुमार मारहाण करताना कैद

छत्रसाल स्टेडियमच्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये सुशील कुमार सागरला मारहाण करताना दिसत असल्याचा आरोप सागरच्या कुटुंबीयांनी केला आहे. या दिवशी सागरचे तीन साथीदार सोनू, भगतसिंग आणि अमित यांनाही स्टेडियममध्ये मारहाण करण्यात आली होती. या सर्वांनी आपल्या जबानींमध्ये मुख्य आरोपी म्हणून सुशील कुमार याचेच नाव घेतले आहे.

सागरच्या शरीरावर 50 हून अधिक जखमा

सुशील कुमार इतर पैलवानांच्या साथीने पूर्ण तयारीनिशी कुस्तीपटू सागर राणाला मारहाण करायला आला होता. पोस्टमार्टम अहवालानुसार सागरच्या छातीखेरीज इतर शरीरावर काठ्या आणि लोखंडी रॉडने वार केल्याच्या जखमा आहेत. त्याच्या शरीरावर 50 हून अधिक जखमा झाल्या आहेत. त्याच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार केले आहेत.

संबंधित बातम्या :

हाणामारीत पैलवानाचा मृत्यू, ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमारचा पोलिसांना शोध

Sushil Kumar | पैलवान सुशील कुमारच्या शोधात पोलिसांची लूकआऊट नोटीस, सागर राणा मृत्यू प्रकरणात नाव

(Olympics Medalist Wrestler Sushil Kumar caught on CCTV while assaulting Sagar Rana allegedly hidden with Yoga Guru)

Non Stop LIVE Update
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.