North Maharashtra Kesari | सुदर्शन कोतकरने पटकावला उत्तर महाराष्ट्र केसरी पुरस्कार

अहमदनगर (Ahmednagar) येथील सुदर्शन महादेव कोतकर (Sudarshan Mahadev Kotkar) याने 'उत्तर महाराष्ट्र केसरी (North Maharashtra Kesari)' हा किताब पटकावला आहे. नाशिक येथील बाळू बोडखे याच्यावर मात करत त्याने ही स्पर्धा जिंकली. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, जिल्हा तालीम संघ आणि संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर कारखान्याच्या वतीने दोन दिवसीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

North Maharashtra Kesari | सुदर्शन कोतकरने पटकावला उत्तर महाराष्ट्र केसरी पुरस्कार
North Maharashtra Kesari
Follow us
| Updated on: Nov 22, 2021 | 8:36 AM

अहमदनगर : अहमदनगर (Ahmednagar) येथील सुदर्शन महादेव कोतकर (Sudarshan Mahadev Kotkar) याने ‘उत्तर महाराष्ट्र केसरी (North Maharashtra Kesari)’ हा किताब पटकावला आहे. नाशिक येथील बाळू बोडखे याच्यावर मात करत त्याने ही स्पर्धा जिंकली. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, जिल्हा तालीम संघ आणि संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर कारखान्याच्या वतीने दोन दिवसीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

अहमदनगरला पाथर्डी येथे उत्तर महाराष्ट्र केशरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत अंतिम लढत नगर येथील सुदर्शन कोतकर आणि नाशिक येथी बाळू बोडखे यांच्यात पार पाडली. यात नगरच्या सुदर्शन कोतकरने बाजी मारली. सुदर्शन कोतकरने चांदीची गदा पटकावलीये.

40 मिनिटांचा खेळ रंगला

सुदर्शन कोतकर आणि बाळू बोडखे यांच्यात तब्बल चाळीस मिनिटे कुस्ती रंगली. कोतकर यांचे वजन 124 किलो तर बोडखे यांचे वजन 84 किलो होते. मात्र, तरीही बोडखे यांनी कोतकरला सहजासहजी जिंकू दिले नाही. त्याने शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली. मात्र, अखेर सुदर्शन कोतकर याने ही स्पर्धा जिंकण्याचा मान मिळवला. तर, बाळू बोडखेला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत तृतीय क्रमांक नगर येथील अनिल ब्राम्हणे याने पटकावला. सुदर्शन कोतकरला पुरस्कार म्हणून चांदीची गदा आणि 51 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.

कोरोनामुळे बंद असलेल्या राज्यातील कुस्ती स्पर्धा आता सुरु झाल्या आहेत. तब्बल दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच पाथर्डी येथे भव्य कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. अहमदनगर कुस्तीगीर परिषद आणि केदारेश्वर सहकारी साखर कारखाना यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत उत्तर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या गटातील जवळपास 300 मल्ल सहभागी झाले होते.

संबंधित बातम्या :

IND VS NZ: रोहित शर्माची हॅट्ट्रिक, विराट कोहली ट्रोल, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

बुद्धिबळपटू संकल्प गुप्ताचं जल्लोषात स्वागत, नागपुरातील 18 वर्षांचा संकल्प झाला ग्रँडमास्टर

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.