VIDEO : फुटबॉल स्टार लिओनल मेस्सीवर फॅन्स पडले तुटून, सुट्टीवर असणाऱ्या मेस्सीला पाहून मियामीमध्ये गर्दी आटोक्याबाहेर

कोपा अमेरिका स्पर्धेत विजय मिळवल्यानंतर अर्जेंटीना संघाचा कर्णधार लिओनल मेस्सी सध्या सुट्टीवर आहे. तो अमेरिकेतील मियामी शहरात फॅमिलीसोबत सुट्टी घालवत आहे.

VIDEO : फुटबॉल स्टार लिओनल मेस्सीवर फॅन्स पडले तुटून, सुट्टीवर असणाऱ्या मेस्सीला पाहून मियामीमध्ये गर्दी आटोक्याबाहेर
लिओनल मेस्सी
Follow us
| Updated on: Jul 18, 2021 | 4:41 PM

जगातील सर्वात प्रसिद्ध खेळ फुटबॉलमधील सर्वात प्रसिद्ध खेळाडू लिओनल मेस्सीचे (Lionel Messi) जगभरात करोडो फॅन्स आहेत. मेस्सीचा खेळ पाहण्यासाठी अक्षरश: वेडे असलेल्या फॅन्सना त्याची एक झलक पाहायला मिळाली तर क्या बात! अशाच काही मेस्सीवेड्या फॅन्सनी अमेरिकेतील मियामी येथे अचानक मेस्सी आल्याचे कळताच त्याच्याभोवती प्रचंड गर्दी केली. मेस्सीच्यी सुरक्षारक्षकांना देखील गर्दीला पांगवणे कठीण झाले. या सर्वाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

34 वर्षीय मेस्सीने नुकताच आपला देश अर्जेंटीनाला 28 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर कोपा अमेरिका ही महत्त्वाची आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकवून दिली.  फायनलच्या सामन्यात अर्जेंटीनाची लढत ब्राझीलसोबत होती. नेयमारच्या ब्राझीलला 1-0 च्या फरकाने अर्जेंटीनाने नमवत विजय मिळवला. या विजयानंतर मेस्सी भावूक झाला होता. इतकी मोठी स्पर्धा जिंकल्यानंतर मेस्सी सध्या विश्रांती म्हणून फॅमिलीसोबत वेळ घालवत आहे.

मियामीमध्ये मेस्सी

मेस्सी फॅमिलीसोबत मियामीमध्ये सुट्टी घालवत आहे. यावेळी एका रेस्ट्रॉरंटमध्ये जेवण्यासाठी गेला असता तेथील मेस्सी फॅन्सना ही बाब कळाली. त्यानंतर मेस्सी बाहेर येत असतानाच त्या हॉटेलबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. मेस्सीचे चाहते त्याला पाहण्यासाठी आणि त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी अक्षरश: मेस्सीवर तुटून पडले. मेस्सी हॉटेल गेटपासून त्याच्या गाडीपर्यंत जाईपर्यंत संपूर्ण गर्दीने मेस्सीला घेरलं होतं. संबधित घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडीओमध्ये मेस्सीचा सुरक्षारक्षकही गर्दी पांगवताना हैरान झाल्याचे दिसून येत आहे.

हे ही वाचा

LIVE सामन्यात गोळीबार, खेळाडूंसह प्रेक्षकांची तारांबळ, एका महिला दर्शकासह तिघेजण जखमी, पाहा VIDEO

Tokyo Olympics : ऑलम्पिकमध्ये कोरोना धोका वाढताच, दोन आणखी खेळाडू कोरोनाची बाधा

(Football Star Lionel Messi gets Mobbed by Many fans During Vacation in Miami)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.