मेस्सीच्या ‘या’ फोटोने तोडले सर्व रेकॉर्ड, इन्स्टाग्रामवर मिळाले सर्वाधिक लाईक्स, पाहा फोटो

34 वर्षीय लिओनल मेस्सीने नुकताच अर्जेंटीना संघाला कोपा अमेरिका चषक जिंकवून दिला. ब्राझीलला नमवत मिळवलेला हा खिताब अर्जेटींना संघासाठी अनेक वर्षानंतर मिळालेला मोठा आंतरराष्ट्रीय खिताब आहे.

मेस्सीच्या 'या' फोटोने तोडले सर्व रेकॉर्ड, इन्स्टाग्रामवर मिळाले सर्वाधिक लाईक्स, पाहा फोटो
लिओनल मेस्सी

मुंबई : जगातील सर्वोत्कृष्ठ फुटबॉलपटू म्हणलं की पोर्तुगाल संघाचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) आणि अर्जेंटीना संघाचा कर्णधार लिओनल मेस्सी (Lionel Messi) यांचीच नाव घेतली जातात. दोघांमध्ये कायमच चुरशीचा खेळ दिसून येतो. हे दोघे एकमेंकाविरुद्ध खेळत असताना मैदानावर किंवा इतर संघासोबत खेळत असताना रेकॉर्ड्सच्या तुलनेत दोघांमध्ये कायम चुरस असते. आता ही चुरस सोशल मीडियावरही दिसून आली. इन्स्टाग्रामवर (Instagram) सर्वाधिक लाईक्स असलेल्या रोनाल्डोच्या एका फोटोला मागे टाकत मेस्सीच्या फोटोने तब्बल 20 मिलियन लाईक्स (20 Million Likes) मिळवले आहेत. हा फोटो स्पोर्ट्स कॅटेगरीच्या फोटोंमध्ये सर्वाधिक लाईक्स मिळालेला एक फोटो ठरला आहे.

अर्जेंटीनाचा कर्णधार 34 वर्षीय मेस्सीने नुकतीच मानाची स्पर्धा कोपा अमेरिका (Copa America) आपल्या देशाला जिंकून दिली. ब्राझीलला नमवत मिळवलेल्या या विजयासह मेस्सीने अनेक वर्षानंतर देशाला एक मोठा आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा खिताब पटकवून दिला. यावेळी कोपा अमेरिका स्पर्धेच्या ट्रॉफीसोबत मेस्सीने  एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला ज्याला हे  20 मिलियन लाईक्स मिळाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Leo Messi (@leomessi)

रोनाल्डोचा रेकॉर्ड तोडला

स्पोर्ट्स कॅटेगरीमध्ये इन्स्टाग्रामवर  सर्वाधिक लाईक्सचा रेकॉर्ड याआधी  ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या एका फोटोला होते. महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांना श्रद्धांजलि वाहतना रोनाल्डोने पोस्ट केलेल्या फोटोला 19.8 मिलियन लाईक्स मिळाले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Cristiano Ronaldo (@cristiano)

हे ही वाचा –

लिओनल मेस्सीशी तुलनेवर सुनील छेत्रीने दिली प्रतिक्रिया, म्हणाला ज्यांना फुटबॉलबद्दल माहिती आहे ते जाणतात की…

Lionel Messi Birthday : दहाव्या वर्षी उपचारासाठी मदत, 20 वर्षांपासून तोच संघ, कोट्यवधींच्या ऑफर्स धुडकावल्या

तिन्ही लीगमध्ये रोनाल्डोचाच डंका! इंग्लंड, स्पेन गाजवल्यानंतर आता इटलीतही रोनाल्डोची यशस्वी वाटचाल

(Lionel Messis Copa America Wining Photo Breaks Cristiano Ronaldos Record for most liked Sports Photo on Instagram)