युगांडाच्या ऑलिम्पिक खेळाडूचा धक्कादायक मृत्यू, ‘त्या’ वादामुळे बॉयफ्रेंडने केलं असं काही

युगांडाची धावपट्टू रेबेका चेप्टेगई हीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एका रिपोर्टनुसार तिच्या बॉयफ्रेंडमुळेच आयुष्य गमवावं लागलं आहे. रेबेका चेप्टेगईने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला होता. नेमकं काय झालं ते जाणून घ्या

युगांडाच्या ऑलिम्पिक खेळाडूचा धक्कादायक मृत्यू, 'त्या' वादामुळे बॉयफ्रेंडने केलं असं काही
Follow us
| Updated on: Sep 05, 2024 | 10:16 PM

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेणाऱ्या युगांडाची एथलीट्स रेबेका चेप्टेगईचा गुरुवारी दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण क्रीडाविश्वात खळबळ उडाली आहे. कारण तिच्या मृत्यूचं कारण दुसरं तिसरं कोणी नसून तिचा बॉयफ्रेंड आहे. रेबेकाच्या बॉयफ्रेंडने तिच्यावर पेट्रोल टाकून आग लावली. यात तिचं शरीर 75 टक्के भाजलं. त्यामुळे तिला केनियाच्या एका रुग्णालयात गंभीर अवस्थेत दाखल केलं होतं. उपचारांना तिने साथ दिली नाही आणि प्राणज्योत मालवली. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत रेबेकाने भाग घेतला होता. तसेच 44 व्या क्रमांकावर राहिली होती. रेबेका मागच्या वर्षी झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत 14व्या स्थानावर होती. तसेच 2022 मध्ये थायलंडमध्ये आयोजित वर्ल्ड माउंटेन अँड ट्रेल रनिंग चॅम्पियनशिपचा किताब जिंकला होता.द गार्जियनच्या रिपोर्टनुसार, रेबेकाचा बॉयफ्रेंड आणि तिच्यात एका जमिनीवर वाद सुरु होता. या घटनेमुळे रेबेकाच्या कुटुंबियांना धक्का बसला आहे. तिच्या वडिलांनी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी काली आहे.

रेबेकाच्या मृत्यूमुळे युगांडामध्ये शोक व्यक्त होत आहे. इतकंच काय तर बॉयफ्रेंड कठोर कारवाई व्हावी यासाठी सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या प्रकरणाची चौकशी करत आहे. या घटनेवर युगांडा ऑलिम्पिक कमिटीचे अध्यक्ष डॉनल्ड रुकारे यांनी सांगितलं की, ‘आम्हाला दु:खद बातमी मिळाली आहे की आमची एथलीट रेबेका चेपटेगडी आता या जगात नाही. आम्ही तिच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना करतो.’

रेबेकाच्या आधीही दोन एथलीट्सची हत्या झाली आहे. एग्नेश टिरोपा आणि डामारिस मुटुआ यांची हत्या झाली आहे. या दोन्ही प्रकरणात जवळच्या लोकांना पोलिसांनी दोषी धरलं आहे. टिरोपाच्या हत्येप्रकरणी तिच्या पतीवर गुन्हा दाखल आहे. तर मुटुआच्या हत्येप्रकरणी तिच्या बॉयफ्रेंडचा शोध घेतला जात आहे.

मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.
आता लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास होणार आरामदायी, कारण ...
आता लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास होणार आरामदायी, कारण ....
मनसेच्या जय मालोकारचा मृत्यू नव्हे खून? पोस्टमार्टेम रिपोर्टनं खळबळ
मनसेच्या जय मालोकारचा मृत्यू नव्हे खून? पोस्टमार्टेम रिपोर्टनं खळबळ.
मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी कोट तयार, आमदारान सांगितली निवडणुकीची तारीख
मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी कोट तयार, आमदारान सांगितली निवडणुकीची तारीख.
जरांगेंची मागणी सरकार पूर्ण करणार? हैदराबाद गॅझेटवर मोठा निर्णय?
जरांगेंची मागणी सरकार पूर्ण करणार? हैदराबाद गॅझेटवर मोठा निर्णय?.
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.