Sushikala Aagashe : सुशिकला आता चीनचं मैदान गाजवणार, आशियाई गेम्स भारताचे प्रतिनिधित्व करणार सुशिकला

Sushikala Aagashe : सुशिकला आता चीनचं मैदान गाजवणार, आशियाई गेम्स भारताचे प्रतिनिधित्व करणार सुशिकला
सुशिकला आता चीनचं मैदान गाजवणार
Image Credit source: tv9

सुशिकलाने महाराष्ट्राच्या सायकलिंग संघात कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडली होती.

तेजस मोहतुरे

| Edited By: शुभम कुलकर्णी

May 25, 2022 | 8:11 AM

भंडारा :  जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात निलज खुर्द हे गाव आहे. पायाभूत सुविधांनी व लोकसंख्येने कमी असलेले हे गाव जिल्ह्याच्या नकाशात शोधतानाही तुम्हाला नाकीनऊ येतील. पण या लहान गावाचं नाव थेट गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत आणि दिल्लीपासून ते यूरोपीय देशांपर्यंत गाजलं. हे सर्व निलज खुर्द सुशिकला (Sushikala Aagashe)आणि दीपाली (Dipali Aagashe)आगाशे या बहिणींमुळं झालंय. विशेष म्हणजे सुशिकला आता चीनचं (china) मैदान गाजवणार आहे. आशियाई चॅम्पियनशिप आणि आशियाई गेम्स (Asian Championship, Asian Games) स्पर्धेत सायकलिंग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व सुशिकला करणार आहे. मागील वर्षी हैदराबाद येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक आणि एक कांस्यपदक सुशिकलाने जिंकले आहेत. जयपूर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत दोन सुवर्ण आणि एक रजत पदकाची कमाई करून सुशिकलाने महाराष्ट्राच्या सायकलिंग संघात कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडली होती. सुशिकला दिल्ली येथे पुढील स्पर्धेसाठी तयारी करत असून 18 ते 22 जून दरम्यान दिल्ली येथे होणाऱ्या एशियन चॅम्पियनशिप आणि 22 ते 25 सप्टेंबर दरम्यान चीनमध्ये होणाऱ्या एशियन गेम्ससाठी तिचा सराव सुरू आहे.

इटली आणि जर्मनीत भारताचं प्रतिनिधीत्व

सुशिकला आगाशे हिला देशापुरते मर्यादित समजून चालणार नाही. या मुलीने युरोपातील इटली आणि जर्मनी यांसारख्या देशातही विविध स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेआहे. तर, दीपाली हिने हॉकी या खेळात राष्ट्रीय स्पर्धेत मोठं नाव केले आहेत. सुशिकला हिने फक्त देशाचे प्रतिनिधीत्वच केलं नाही तर भारताला योग्य स्थानही पटकावून दिले. त्यासोबतच नुकत्याच यावर्षी मार्च महिन्यात हैदराबाद येथे झालेल्या राष्ट्रीय सायकल स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले.

मुलींना मुलाप्रमाणे वाढवलं

सुशिकला आणि दीपाली दोघी सख्या बहिणी निलज खुर्द येथे राहणाऱ्या दुर्गाप्रसाद आगाशे यांच्या मुली आहेत. वडील अल्पभूधारक शेतकरी, शेतीतून घर चालवणे बिकट झाल्यामुळे घर बांधण्याच्या कामावर जातात. पण, मुलींना मुलाप्रमाणे त्यांनी वाढवलं. सुशिकलाला सहाव्या वर्गात असताना तिच्यात असलेली खेळाची आवड बघून तिच्या शिक्षकांनी देव्हाडी जवळील तुडका येथे होणार्‍या क्रीडा प्रबोधिनीला जाण्याचा सल्ला दिला, असं तिचे वडील दुर्गाप्रसाद आगाशे यांनी सांगितलं. सुशिकला रोज तिच्या वडिलांबरोबर सकाळी व सायंकाळी तुडका येथील मैदानावर खेळण्याकरिता जायची.

हे सुद्धा वाचा

आवडीनुसार दोघींकडून खेळाची निवड

दोघींनी आपल्या आवडीनुसार खेळाची निवड केली सुशिकला सायकल चालविण्यात पारंगत झाली. सुशिकला आशियाई क्रीडा स्पर्धा,खेलो इंडिया यूथ गेम यांसारख्या अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरांवरील स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागली.दीपाली हिने हॉकी हा खेळ निवडला. दीपालीनं सुध्दा राज्यस्तरीय हाँकी स्पर्धेत अनेक लहान मोठे पदक पटकवली आहेत. तर तब्बल पाच वेळा राष्ट्रीय स्पर्धेत खेळली, असल्याचं दीपाली आगाशे हीनं सांगितलं.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें