पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा हॉकी उपांत्य फेरीचा सामना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या एका क्लिकवर

भारतीय हॉकी संघाने ऑलिम्पिक स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली आहे. उपांत्यपूर्व फेरीत ग्रेट ब्रिटेन संघाचा पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव केला. आता भारताचा उपांत्य फेरीत जर्मनीशी सामना होणार आहे. या सामन्यात विजय मिळवताच भारताचं मेडल पक्कं होणार आहे. चला जाणून घेऊयात कधी आणि कुठे पाहता येणार सामना ते

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा हॉकी उपांत्य फेरीचा सामना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या एका क्लिकवर
Image Credit source: Hockey India
Follow us
| Updated on: Aug 05, 2024 | 9:03 PM

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने जबरदस्त कामगिरी केली आहे. उपांत्यपूर्व फेरीचा सामना हृदयाची धडधड वाढवणारा होता. ग्रेट ब्रिटेन विरुद्ध उपांत्यूपूर्व फेरीतील दुसऱ्या सत्राच्या दुसऱ्या मिनिटाला अमित रोहितदासला रेड कार्ड मिळालं. त्यामुळे उर्वरित संपूर्ण सामन्यात भारताला दहा खेळाडूंसह खेळावं लागलं. त्यामुळे भारतीय संघ बचावात्मक पवित्र्यात गेला होता. तरीही भारताने पेनल्टी कॉर्नरचा फायदा घेत 1-0 अशी आघाडी मिळवली. पण त्यानंतरही ग्रेट ब्रिटेनचा आक्रमक खेळ सुरुच राहिला त्यामुळे भारतीय संघ बॅकफूटवर गेला. त्यात दहा खेळाडूंचा फायदा घेत दुसऱ्या सत्रातच गोल बरोबरी केली. तिसऱ्या आणि चौथ्या अवघड सत्रात भारताची चांगलीच कसोटी लागली. पण भारताने आणि खासकरून गोलकीपर श्रीजेशने सर्व हल्ले परतावून लावले आणि सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला. भारताने पेनल्टी शूटआऊटमध्ये सामना 4-2 ने जिंकला. यात श्रीजेशने कमाल करत दोन गोल अडवले आणि भारताला विजय मिळवून दिला.

भारताकडे 1980 नंतर ऑलिम्पिक हॉकीमध्ये पहिलं सुवर्ण पदक मिळवण्याची संधी आहे. जवळपास 24 वर्षानंतर भारताला ही संधी पुन्हा एकदा चालून आली आहे. मागच्या पर्वात भारतीय संघाला उपांत्य फेरीत पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. त्यामुळे कांस्य पदकासाठी लढाई केली आणि जिंकलं. पण आता सुवर्ण पदकावरच भारताची नजर असणार आहे. त्यामुळे जर्मनीविरुद्धच्या खेळाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे. दरम्यान टोक्यो 2020 ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाच्या लढतीत जर्मनीने भारताचा सामना केला होता.तेव्हा धाकधूक वाढवणाऱ्या सामन्यात भारतीय पुरुष हॉकी संघाने 5-4 असा विजय मिळवला होता. तसेच 40 वर्षानंतर हॉकीमध्ये मेडल मिळवलं होतं.

भारत जर्मनी उपांत्य फेरीचा सामना कधी आणि किती वाजता?

भारत आणि जर्मनी यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना 6 ऑगस्टला होणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 10.30 वाजता ही लढत होणार आहे.

कुठे पाहता येणार भारत जर्मनी हॉकी सामना?

पॅरिस 2024 ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत भारत विरुद्ध जर्मनी हॉकी सामन्याचे थेट प्रक्षेपण JioCinema वर असेल. दुसरीकडे, Sports18 नेटवर्क टीव्ही चॅनेलवर थेट पाहता येईल.

अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.