Vinesh Phogat Case : विनेश फोगाटला सिल्व्हर मेडल मिळणार की नाही ? आज लागणार निकाल

पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धा नुकतीच पार पडली. यावेळी भारताची दिग्गद कुस्तीपटू विनेश फोगाट बरीच चर्चेत होती. ती अंतिम फेरीत तर पोहोचली पण त्यादिवशी तिचं वजन ठरलेल्या मर्यादेपेक्षा 100 ग्रॅम अधिक होतं, त्यानंतर ती अपात्र ठरली आणि स्पर्धेबाहेर गेली. त्या निर्णयाविरोधात विनेशने CAS मध्ये याचिका दाखल केली होती. आणि संयुक्तरित्या सिल्व्हर मेडल देण्याची मागणी केली होती.

Vinesh Phogat Case : विनेश फोगाटला सिल्व्हर मेडल मिळणार की नाही ? आज लागणार निकाल
विनेश फोगाटला सिल्व्हर मेडल मिळणार का ?
Follow us
| Updated on: Aug 13, 2024 | 8:46 AM

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताची दिग्गज कुस्तीपटू विनेश फोगटला तिच्या दमदार कामगिरीचे बक्षीस मिळणार की नाही हे आज ठरणार आहे. गेल्या 6 दिवसांपासून विनेश ज्या हक्कासाठी लढत होती, त्याचा निकाल आज तिच्या बाजून लागेल की नाही, हे आज स्पष्ट होईल. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या 50 किलो गटात निर्धारित वजनापेक्षा 100 ग्रॅम जास्त आढळल्याने विनेश फोगटला अंतिम फेरीच्या दिवशी अपात्र ठरवत संपूर्ण स्पर्धेतून बाहेर काढण्यात आलं आणि त्यामुळे ती पदकांच्या शर्यतीतूनही बाहेर पडली. यामुळे मोठा गदारोळ माजला होता. मात्र या निर्णयाविरोधात विनेशने याविरोधात क्रीडा लवादात म्हणजेच कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्स (CAS) मध्ये अपील केले होते. त्यावर सुनावणीही झाली आणि आता अनेकवेळा निर्णय पुढे ढकलल्यानंतर अखेर आज (मंगळवार, १३ ऑगस्ट रोजी) न्यायालय अंतिम निर्णय देणार आहे. विनेशला सिल्व्हर मेडल मिळणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

7 ऑगस्ट रोजी झालेल्या अंतिम फेरीच्या दिवशी सकाळी 1248304अपात्र ठरवण्यात आले, त्यानंतर तिने त्याच संध्याकाळी CAS कडे अपील केले. तेव्हापासून विनेशसह संपूर्ण देश या निर्णयाची वाट पाहत होता, मात्र ‘दामिनी’ या हिंदी चित्रपटातील वकील सनी देओलप्रमाणेच विनेशलाही गेल्या काही दिवसांपासून केवळ ‘तारीख पे तारीख’ मिळाली आहे. आधी ऑलिम्पिक संपेपर्यंत यावर निर्णय घ्यायचा होता, आता हा निर्णय खेळ संपल्यानंतर 2 दिवसांनी येईल आणि तो दिवस आजचा, अर्थात 13 ऑगस्टचा आहे.

3 तासांची सुनावणी, 4 दिवसांनी निर्णय

हे सुद्धा वाचा

ऑलिम्पिक खेळांसाठी पॅरिसमध्ये स्थापन करण्यात आलेल्या CAS एड-हॉक विभागात शुक्रवारी, 9 ऑगस्ट रोजी या प्रकरणाची सुनावणी झाली. सुमारे 3 तास चाललेल्या या सुनावणीत विनेशच्या वकिलांनी आपली बाजू मांडली. या काळात भारतीय ऑलिम्पिक संघटनेनेही पक्ष म्हणून सहभागी होऊन आपली भूमिका मांडली. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आणि युनायटेड वर्ल्ड रेसलिंगच्या वकिलांनीही युक्तिवाद केला होता. सीएएस लवाद डॉ. ॲनाबेल बेनेट यांच्यासमोर ही सुनावणी झाली. यावर 10 ऑगस्टला निर्णय येईटत होते, पण CAS ने त्या दिवशी निर्णय पुढे ढकलून दोन्ही पक्षांकडून काही कागदपत्रांची मागणी केली आणि निर्णयासाठी 13 ऑगस्ट ही तारीख निश्चित केली.

सिल्व्हर मेडल की निराशा – विनेशच्या नशिबात काय?

अखेर आज, म्हणजेच 13 ऑगस्ट रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 9.30 वाजेपर्यंत या प्रकरणाचा निकाल येईल. याप्रकरणी (आपल्याला) सिल्व्हर मेडल देण्याची मागणी विनेशने केली आहे. एका दिवसापूर्वी उपांत्य फेरीसह तिचे सर्व तीन सामने 50 किलोच्या निर्धारित वजन मर्यादेत राहून खेळले होते आणि तिन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला होता, या आधारावर विनेशने ही मागणी केली आहे. अंतिम सामन्याच्या दिवशीच तिचे वजन 100 ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आले आणि त्यामुळे तिला केवळ अंतिम फेरीतूनच अपात्र ठरवण्यात यावे, संपूर्ण स्पर्धेतून नव्हे असं तिचं म्हणणं आहे. अशा परिस्थितीत तिला संयुक्तपणे सिल्व्हर मेडल मिळावं, अशी तिची मागणी आहे. मात्र तिच्या या मागणीवर काय निर्णय होतो, तिला सिल्व्हर मेडल मिळेल की नाही याचा निर्णय आज होईल.

अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.