प्राचीने इतिहास रचला, पॅरा वर्ल्ड कपमध्ये ‘कॅनो’त पदक जिंकणारी पहिली भारतीय

प्राची यादवचं छोट्या आकाराच्या तलावामध्ये मागच्या चार वर्षांपासून कठोर प्रशिक्षण सुरु आहे. प्राचीने लॉक डाउमध्येही विशेष परवानगी घेऊन आपली ट्रेनिंग सुरुच ठेवली होती.

प्राचीने इतिहास रचला, पॅरा वर्ल्ड कपमध्ये 'कॅनो'त पदक जिंकणारी पहिली भारतीय
Prachi yadav Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: May 30, 2022 | 5:14 PM

मुंबई: मध्य प्रदेशची पॅरा कॅनो खेळाडू (Para Cano Player) प्राची यादवने (Prachi Yadav) पॅरा कॅनो वर्ल्ड कपमध्ये इतिहास रचला. तिने भारतासाठी कास्यपदक मिळवलं. पोलंडच्या पोजनन शहरात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. तिने महिलांच्या 200 मीटर वीएल-2 इवेंटमध्ये हे यश मिळवलं. कयाकिंग आणि कॅनोइंगमध्ये पदक जिंकणारी प्राची भारताची पहिली खेळाडू बनली आहे. याआधी प्राचीने टोक्यो पॅरालिंपिक स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये (Semi final) स्थान मिळवलं होतं. प्राचीने 1:04.71 सेकंदाच्या वेळेसह कास्यपदक मिळवलं. कॅनडाच्या ब्रिआना हेनेसी प्राचीपेक्षा पुढे होती. तिने 1:01.58 सेकंदाच्या वेळेसह रौप्यपदक मिळवलं. ऑस्ट्रेलियाच्या सुजैन सायपेलने 1:01.54 सेकंदाच्या वेळेसह सुवर्णपदकाला गवसणी घातली. कयाकिंग आणि कॅनोइंग या क्रीडा प्रकारात भारताकडून हे आतार्यंतचं सर्वोत्तम प्रदर्शन आहे. 26 मे रोजी या स्पर्धेची सुरुवात झाली होती.

लॉक डाउमध्येही विशेष परवानगीने ट्रेनिंग

प्राची यादवचं छोट्या आकाराच्या तलावामध्ये मागच्या चार वर्षांपासून कठोर प्रशिक्षण सुरु आहे. प्राचीने लॉक डाउमध्येही विशेष परवानगी घेऊन आपली ट्रेनिंग सुरुच ठेवली होती. प्राचीचे कोच मयंक ठाकूर यांनी तिच्या प्रदर्शनावर आनंद व्यक्त केला. प्राची भरपूर मेहनत आहे. ती आपलं सर्व लक्ष खेळावरच केंद्रीत करते, असं ठाकूर म्हणाले.

मंजीत सिंह फायनलमध्ये जागा बनवण्यात यशस्वी

पुरुष वर्गाच्या 200 मीटर शर्यतीत के वीएल 2 इवेंटमध्ये मंजीत सिंह फायनलमध्ये जागा बनवण्यात यशस्वी ठरले. अन्य खेळाडू जयदीप सुद्धा 200 मीटर रेसमध्ये वीएल 3 इवेंटमध्ये सहभागी झाला होता. जयदीप सुद्धा सेमी फायनलमध्ये पोहोचण्यात यशस्वी ठरला.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.