VIDEO: पंतने स्टम्पिंग चुकवलं, प्रेक्षक ओरडू लागले धोनी धोनी

मोहाली: भारत आणि ऑस्ट्रेलिया (India Vs Australia) यांच्यातील चौथ्या वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियाने थरारक विजय मिळवला. अश्टन टर्नरने तुफानी खेळी करत ऑस्ट्रेलियाला भारतावर चार विकेट्सने विजय मिळवून दिला. या विजयामुळे कांगारुंनी मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली. भारताचं ढिसाळ क्षेत्ररक्षण हे कालच्या पराभवाला कारणीभूत ठरलं, अशी कबुली टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने दिली. या सामन्यात एम …

VIDEO: पंतने स्टम्पिंग चुकवलं, प्रेक्षक ओरडू लागले धोनी धोनी

मोहाली: भारत आणि ऑस्ट्रेलिया (India Vs Australia) यांच्यातील चौथ्या वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियाने थरारक विजय मिळवला. अश्टन टर्नरने तुफानी खेळी करत ऑस्ट्रेलियाला भारतावर चार विकेट्सने विजय मिळवून दिला. या विजयामुळे कांगारुंनी मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली.

भारताचं ढिसाळ क्षेत्ररक्षण हे कालच्या पराभवाला कारणीभूत ठरलं, अशी कबुली टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने दिली. या सामन्यात एम एस धोनीऐवजी ऋषभ पंतचा (Rishabh Pant) समावेश करण्यात आला होता. मात्र ऋषभ पंतने विकेटकीपिंगदरम्यान अनेक संधी गमावल्या. पंतने फलंदाजी करताना 24 चेंडूत 36 धावा केल्या, मात्र त्याला विकेटकीपिंगदरम्यान चांगली कामगिरी करता आली नाही.

शेवटच्या 10 षटकांमद्ये ऋषभ पंतने विकेटमागे अनेक संधी दवडल्या. त्यामुळे सोशल मीडियातून त्याच्यावर टीका होत आहे. पंतने चक्क मॅचविनिंग खेळी करणाऱ्या टर्नरची स्टम्पिंग चुकवल्याने मैदानावरील प्रेक्षक धोनी धोनी असं ओरडू लागले. स्टम्पिंग सोडल्यामुळे कर्णधार विराट कोहलीने हैराण झाला. तो सुद्धा हात दाखवून विचारणा करु लागला होता. सोशल मीडियावर याबाबत पंतवर तुफान टीका होत आहे.

VIDEO:

चौथ्या वन डे सामन्यात करिअरमधील दुसरा वन डे सामना खेळणाऱ्या अश्टन टर्नरने केवळ 43 चेंडूत 5 चौकार आणि 6 षटकारांच्या सहाय्याने नाबाद 83 धावा केल्या. त्याच्या या थरारक खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला भारतावर सहज विजय मिळवता आला.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने 50 षटकात 9 बाद 358 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 47.5 षटकात 6 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. पीटर हॅण्डस्कोम्ब, उस्मान ख्वाजा आणि अश्टन टर्नर हे ऑस्ट्रेलियाच्या विजयाचे शिल्पकार ठरले. हॅण्डस्कोम्बने 117, ख्वाजाने 91 धावा आणि टर्नरने 83 धावा केल्या.

संबंधित बातम्या

5 संधी हुकल्या, कोहली म्हणाला बहाणा चालणार नाही 

INDvsAUS : टर्नरने मॅच फिरवली, ऑस्ट्रेलियाचा भारतावर थरारक विजय  

VIDEO: पंतने स्टम्पिंग चुकवलं, प्रेक्षक ओरडू लागले धोनी धोनी
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *