ऋषभ पंतच्या ऑडिओवरुन वाद, IPL चा संस्थापक मोदी म्हणतो हे तर फिक्सिंग!

नवी दिल्ली: आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील दहावा सामना वादात सापडला आहे. दिल्ली कॅपिटल (DC) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात 30 मार्चला दिल्लीतील फिरोज शाह कोटला मैदानात रोमहर्षक सामना झाला. टाय झालेला हा सामना सुपर ओव्हरपर्यंत रंगला. या सामन्यात दिल्लीने बाजी मारली. या सामन्यात कोलकात्याने दिल्लीसमोर 186 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. मात्र दिल्लीनेही 186 धावा केल्याने …

ऋषभ पंतच्या ऑडिओवरुन वाद, IPL चा संस्थापक मोदी म्हणतो हे तर फिक्सिंग!

नवी दिल्ली: आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील दहावा सामना वादात सापडला आहे. दिल्ली कॅपिटल (DC) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात 30 मार्चला दिल्लीतील फिरोज शाह कोटला मैदानात रोमहर्षक सामना झाला. टाय झालेला हा सामना सुपर ओव्हरपर्यंत रंगला. या सामन्यात दिल्लीने बाजी मारली.

या सामन्यात कोलकात्याने दिल्लीसमोर 186 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. मात्र दिल्लीनेही 186 धावा केल्याने सुपर ओव्हरद्वारे निकाल ठरवण्यात आला. यामध्ये दिल्लीने विजय मिळवला.

हा सामना सुपर ओव्हरमुळे चर्चेत राहिलाच, मात्र या सामन्यातील ऋषभ पंतचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. विकेटकिपिंग करताना ऋषभ पंतने केलेल्या कमेंट्स रेकॉर्ड झाल्या असून, त्या वादग्रस्त आहेत. स्टम्प माईकमध्ये पंतचा आवाज रेकॉर्ड झाला आहे.

व्हायरल व्हिडीओनुसार पंत म्हणतो, “हा तर तसाही चौकार आहे”. सामन्यातील चौथ्या षटकात कोलकात्याचा रॉबिन उथप्पा फलंदाजी करत होता, तर दिल्लीचा संदीप लामिछाने गोलंदाजी करत होता. त्यावेळी संदीपच्या पुढच्या चेंडूवर उथप्पाने चौकार मारला. त्यामुळे हा सामना फिक्स होता, अशी चर्चा आता सोशल मीडियावर सुरु झाली आहे.

दरम्यान, बीसीसीआयने हे संपूर्ण प्रकरण खोडून काढलं आहे. या सर्व चर्चा चुकीच्या आहेत, असं बीसीसीआयने म्हटलं. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, “पंतने त्या वाक्यापूर्वी (हा तर तसाही चौकार आहे) कोणतं वक्तव्य केलं होतं, ते कोणीही ऐकलेलं नाही. खरंतर तो कर्णधार श्रेयस अय्यरला ऑफसाईडला क्षेत्ररक्षक वाढवण्यासाठी सांगत होता. त्यामुळे चौकार वाचू शकेल, असं त्याचं मत होतं.”

दुसरीकडे आयपीएलचे माजी प्रमुख ललित मोदीनेही ट्विट करुन, हे फिक्सिंग असल्याची शक्यता व्यक्त केली. ललित मोदीने ऋषभ पंतचा एक व्हिडीओ ट्विट केला, त्यामध्ये पंत म्हणतो ‘हा तर तसाही चौकार आहे’.

ललित मोदी म्हणतो, “ही मस्करी असेल का? मला यावर विश्वास बसत नाही. इतक्या मोठ्या स्थरावर मॅच फिक्सिंग. बीसीसीआय आणि आयपीएल प्रशासन केव्हा जागे होणार?”

संबंधित बातम्या 

दिल्ली विरुद्ध कोलकाता… IPL मध्ये सुपरओव्हरचा थरार रंगला!  

जेव्हा पिझ्झा डिलिव्हरी बॉयने पंजाब विरुद्ध राजस्थान सामना थांबवला…  

IPL: संजू सॅमसनचं घणाघाती शतक, तरीही राजस्थानचा पराभव 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *