
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा सुरु व्हायला आता फक्त चार आठवड्यांचा कालावधी उरला आहे. 19 फेब्रुवारीपासून टुर्नामेंट सुरु होईल. 20 फेब्रुवारीला टीम इंडिया पहिला सामना खेळणार आहे. पण या महत्त्वाच्या स्पर्धेआधी टीम इंडियात तीव्र स्वरुपाचे मतभेद आहेत. रोहित शर्मा आणि गौतम गंभीर यांच्यामध्ये अनेक मुद्यांवरुन मतभेद आहेत. गौतम गंभीर यांच्या कठोर स्वभावामुळे टीममध्ये त्यांच्याविरोधात बंडखोरीची स्थिती उदभवू शकते. या सगळ्यामध्ये गौतम गंभीर आपल्या पदाचा राजीनामा देणार का? आठवर्षांपूर्वी भारतीय कोचसोबत चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेदरम्यान असं झालं होतं.
टीमच्या खराब प्रदर्शनापेक्षाही संघात बंडखोरी हे गंभीर समोरच मोठ आव्हान बनू शकतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार गंभीरची काम करण्याची पद्धत अनेक खेळाडूंना पटलेली नाही. खासकरुन सिनियर खेळाडू हैराण आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात हेड कोच आणि कॅप्टमनध्ये मतभेद झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. इतकच नाही, त्यांनी सर्व खेळाडूंबाबत कठोर भूमिका घेतली. बीसीसीआयला सांगून 10 नवीन नियम आणले.
आठ वर्षांपूर्वी असच घडलेलं
हीच कठोरता चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पराभवाच कारण बनू शकते. त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडलं जाऊ शकतं. हे असं आठ वर्षापूर्वी सुद्धा घडलय. 2017 साली अनिल कुंबळे यांना चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर त्यांच्या कठोर स्वभावामुळे राजीनामा द्यावा लागला होता. विराट कोहलीसमोर त्यांना झुकावं लागलेलं.
किती पराभव झाले?
गौतम गंभीर यांनी मागच्यावर्षी 2024 ऑगस्टमध्ये हेड कोच पदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर टीमच्या कामगिरीत सातत्याने घसरण झाली आहे. गंभीर हेड कोच असतानाच 27 वर्षानंतर श्रीलंकेत वनेड सीरीजमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला. मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध कसोटी मालिकेत पराभव झाला. ऑस्ट्रेलियात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये 1-3 ने पराभव झाला. टीम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या बाहेर गेली. त्यांच्यावर खूप दबाव आहे. टीम इंडियाचा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पराभव झाल्यास गौतम गंभीरच्या अडचणी वाढू शकतात.
कुंबळे आणि कोहलीचा वाद
भारतीय टीमचे दिग्गज स्पिनर अनिल कुंबळे यांनी जून 2016 मध्ये हेड कोचची जबाबदारी संभाळली. त्यांच्या नियुक्तीला क्रिकेट एडवायजरी कमिटीचे सदस्य सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर आणि वीवीएस लक्ष्मण यांनी हिरवा कंदिल दाखवला. पण त्यावेळी कुंबळे आणि कोहलीमध्ये एकमत होऊ शकलं नाही.