Sania Mirza-Shoaib Malik घटस्फोट जाहीर करणं का टाळतायत? खरं कारण आलं समोर

Sania Mirza-Shoaib Malik: ....तेव्हाच या प्रश्नाच उत्तर मिळेल

Sania Mirza-Shoaib Malik घटस्फोट जाहीर करणं का टाळतायत? खरं कारण आलं समोर
Sania mirza-shoaib Malik divorce newsImage Credit source: instagram
Follow us
| Updated on: Nov 29, 2022 | 7:06 PM

दुबई: सानिया मिर्झा आणि शोएब मलिक ही क्रीडा क्षेत्रातील दोन मोठी नावं आहेत. सानियाने टेनिस, तर शोएबने क्रिकेटमध्ये नाव कमावलं. स्पोर्ट्समधून ओळख बनवलेल्या सानिया-शोएबने काही वर्षांपूर्वी लग्न केलं. त्यांचा संसार सुखाने सुरु होता. सानिया भारतीय तर शोएब पाकिस्तानी, त्यामुळे त्यांच्या लग्नाला भारतातून मोठ्या प्रमाणात विरोध झाला. मात्र ही ट्रोलिंग सहन करुन सानिया आणि शोएब विवाहबद्ध झाले.

घटस्फोटाच्या बातम्या आल्या

आता हे जोडपं विभक्त होणार असल्याची चर्चा आहे. सानियाने सोशल मीडियावर एक पोस्ट केली, त्यावरुन या जोडप्यात सर्व काही आलबेल नसल्याचा अंदाज बांधला गेला. भारतीय आणि पाकिस्तानी मीडियामध्ये त्यांच्यात दुरावा वाढल्याच्या, घटस्फोट घेणार असल्याच्या बातम्या सातत्याने प्रसिद्ध झाल्या.

तथ्य आहे, म्हणायला हरकत नाही

पण दोन्ही बाजुंनी या वृत्ताला दुजोरा दिला नाही किंवा वुत्त फेटाळलं सुद्धा नाही. सानिया-शोएब दोघांनी ठामपणे घटस्फोटाची बातमी खोडून काढलेली नाही. त्यामुळे कुठे ना कुठे, प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांमध्ये तथ्य आहे, म्हणायला हरकत नाही.

हा सर्व पब्लिसिटी स्टंट आहे?

सानिया आणि शोएब दोघे वेगळे होणार आहेत, मग ते एकत्र कार्यक्रम कसा करतात? खरोखर ते घटस्फोट घेणार की, हा सर्व पब्लिसिटी स्टंट आहे, असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. आता या जोडप्याच्या एका जवळच्या मित्राने दोघे घटस्फोट घेणार असल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब केलय. इनसाइड स्पोर्ट्ने हे वृत्त दिलय.

या मित्राच्या म्हणण्यानुसार, दोघे अधिकृतपणे वेगळे झाले आहेत. काही कायदेशीर बाबी असल्यामुळे ते या क्षणाला हा निर्णय जाहीर करु शकत नाही, असं या जोडप्याच्या जवळच्या व्यक्तीने सांगितलं.

काय कारण आहे, जाहीर न करण्यामागे?

सानिया-शोएब यांची कपल म्हणून काही शोज साठी कमिटमेंट आहे. शूटिंग पूर्ण करण्यासाठी त्यांनी कॉन्ट्रॅक्ट केलं आहे. त्यामुळे सगळ्या कमिटमेंट्स पूर्ण केल्यानंतर ते घटस्फोटाचा निर्णय जाहीर करु शकतात. म्हणूनच त्यांनी अद्यापपर्यंत घटस्फोटाची घोषणा केलेली नाही. अलीकडेच सानिया मिर्झाचा वाढदिवस झाला. शोएब मलिकने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दोघांचा एकत्रित फोटो पोस्ट केला. पण सानियाने त्यावर काही प्रतिक्रिया दिली नाही.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.