धोनीने माझ्यावर विश्वास दाखवला, दुसऱ्या संघांनी बाहेर काढलं असतं : शेन वॉटसन

चेन्नई : क्रिकेटर शेन वॉटसन आमच्यासाठी मॅच विनर आहे, असं चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीने सांगितलं. सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात मंगळवारी झालेल्या सामन्यान वॉटसनने उत्कृष्ट कामगिरी करत चेन्नई सुपर किंग्सला विजय मिळवून दिला. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात वॉटसनने 96 धावा काढल्या. चेन्नई सुपर किंग्सने हा सामना जिंकून …

Shane Watson CSK, धोनीने माझ्यावर विश्वास दाखवला, दुसऱ्या संघांनी बाहेर काढलं असतं : शेन वॉटसन

चेन्नई : क्रिकेटर शेन वॉटसन आमच्यासाठी मॅच विनर आहे, असं चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीने सांगितलं. सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात मंगळवारी झालेल्या सामन्यान वॉटसनने उत्कृष्ट कामगिरी करत चेन्नई सुपर किंग्सला विजय मिळवून दिला. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात वॉटसनने 96 धावा काढल्या. चेन्नई सुपर किंग्सने हा सामना जिंकून प्लेऑफमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. 11 पैकी 8 सामने जिंकून चेन्नई सुपर किंग्सने सध्या 16 अंक मिळवले आहेत.

वॉटसनच्या या जबरदस्त खेळीनंतर धोनीने त्याचं कौतुक केलं. “वॉटसन आमच्यासाठी मॅच विनर आहे. आम्ही त्याला जास्तीत जास्त संधी देण्याचा प्रयत्न करत आहोत”, असं धोनी म्हणाला. वॉटसनच्या खराब फॉर्मनंतरही चेन्नई सुपर किंग्सने त्याला अनेक वेळा संधी दिल्या.

वॉटसन काय म्हणाला?

या समन्यानंतर वॉटसन म्हणाला, “मला धावा काढायच्याच आहेत, हे तर निश्चित होतं. मी एमएस धोनी आणि चेन्नई सुपर किंग्सचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंगला धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. मी आजपर्यंत ज्या-ज्या संघांसाठी खेळलो, त्यांनी मला आतापर्यंत संघातून बाहेर केलं असतं. पण, धोनी आणि स्टीफन फ्लेमिंग यांनी माझ्यावर विश्वास ठेवला.”

वॉटसनने या सामन्यात 53 चेंडूत 96 धावा केल्या. यादरम्यान व्हॉट्ससनने 6 षटकार आणि 9 चौकार ठोकले.

भुवनेश्वर कुमारनेही वॉटसनचं कौतुक केलं

सनरायझर्स हैद्राबादचा कर्णधार भुवनेश्वर कुमारनेही वॉटसनचं कौतुक केलं. “आम्ही चांगला स्कोअर केला होता. खेळपट्टी गोलंदाजांना मदत देणारी होती. तरीही आम्ही वॉटसनला थांबवू शकलो नाही. ज्याप्रकारे वॉटसन फलंदाजी करत होता, आम्ही जास्त काही करु शकलो नाही. चेन्नई सुपर किंग्सला विजय मिळवून देण्याचं पूर्ण श्रेय हे वॉटसनचं आहे”, असं भुवनेश्वर कुमार म्हणाला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *