ENG vs IND : ज्याचं उत्तर नाही, तोच प्रश्न शुबमन गिलसमोर 1595 दिवसांनी पुन्हा आला, इतिहास बदलणार की पुनरावृत्ती?

ENG vs IND : शुबमन गिलची खरी परीक्षा लॉर्ड्स टेस्ट मॅचमध्ये आहे. कारण आता त्याच्यासमोर तो प्रश्न आलाय, ज्याचं उत्तर त्याच्याकडे अजूनपर्यंत नाहीय. 1595 दिवसांनी समोर आलेल्या या मोठ्या प्रश्नाच गिल कसं उत्तर देणार? याची उत्सुक्ता आहे.

ENG vs IND : ज्याचं उत्तर नाही, तोच प्रश्न शुबमन गिलसमोर 1595 दिवसांनी पुन्हा आला, इतिहास बदलणार की पुनरावृत्ती?
shubman gill
Image Credit source: PTI
| Updated on: Jul 10, 2025 | 9:59 AM

टीम इंडियाचा कॅप्टन शुबमन गिल सध्या प्रचंड फॉर्ममध्ये आहे. इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या टेस्ट सीरीजच्या पहिल्या दोन सामन्यात त्याने 585 धावा केल्या आहेत. आता भारत आणि इंग्लंडमध्ये तिसरा सामना लॉर्ड्समध्ये आहे. या मैदानावर मॅच खेळण्यासाठी उतरण्याआधी, शुबमन गिलसमोर 1595 दिवसांनी पुन्हा एकदा एका मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मागच्या दोन सामन्यात गिलसमोर हा प्रश्न निर्माण झाला नाही. पण लॉर्ड्समध्ये हा प्रश्न येऊ शकतो. त्याची पूर्ण गॅरेंटी आहे. आम्ही ज्या प्रश्नाबद्दल बोलतोय, त्याचा संबंध इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरशी आहे.

लॉर्ड्स टेस्टद्वारे जोफ्रा आर्चर तब्बल 1595 दिवसांनी क्रिकेटच्या मोठ्या फॉर्मेटमध्ये पुनरागमन करणार आहे. तो भारताविरुद्ध शेवटचा कसोटी सामना 25 फेब्रुवारी 2021 रोजी खेळला होता. त्यानंतर बरोबर 1595 दिवसांनी आर्चर पुन्हा टेस्ट मॅच खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, आर्चरच्या पुनरागमनाचा टीम इंडियाचा कॅप्टन शुबमन गिलशी काय संबंध?. तर, याचं उत्तर दोघांच्या रेकॉर्डमध्ये लपलं आहे.

दोघांचा रेकॉर्ड काय?

जोफ्रा आर्चर आपला शेवटचा कसोटी सामना भारतात खेळला होता. त्यावेळी त्याने शुबमन गिलला बाद केलं होतं. टेस्ट क्रिकेटमध्ये शुबमन गिलने आतापर्यंच जोफ्रा आर्चरच्या 28 चेंडूंचा सामना केला आहे. त्यात आर्चरने त्याला दोनदा आऊट केलय. गिलने आर्चर विरोधात अवघ्या 9 च्या सरासरीने 18 धावा केल्या आहेत.

इतिहास बदलणार की पुनरावृत्ती होणार?

मागच्या 35 वर्षांपासून लॉर्ड्सच्या मैदानात कुठल्याही भारतीय कर्णधाराने 50 प्लस धावा केलेल्या नाहीत. शुबमन गिलचा फॉर्म लक्षात घेता हा खराब रेकॉर्ड यावेळी बदलेल अशी अपेक्षा आहे. पण आता जोफ्रा आर्चरच्या रुपाने 1595 दिवसांनी पुन्हा एकदा मोठा प्रश्न निर्माण झालाय. शुबमन गिलला भारतीय कर्णधारांच्या नावावर असलेला हा खराब रेकॉर्ड बदलण जमेल का?. गिल आणि आर्चरच्या या लढाईत इतिहास बदलणार की पुनरावृत्ती होणार? याची उत्सुक्ता आहे.  भारत आणि इंग्लंडमधील या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत सध्या दोन्ही टीम्स 1-1 अशा बरोबरीत आहेत.