टीम इंडियामध्ये पुनरागमन करणार का पुजारा ? इंग्लिश काउंटीमध्ये कमाल करतेय चेतेश्वरची फलंदाजी

टी20 मध्ये लक्षणीय पुनरागमनाची आशा घेऊन चेतेश्वर पुजारानं स्वदेशी मायक्रो-ब्लॉगिंग मंच Koo ऐपवर ससेक्सच्या कार्यकाळाला अद्भुत असं संबोधलं आहे. तो कू ऐप पर पोस्ट करताना म्हणतो: @sussexccc च्या सोबत काम करणं खरोखर अद्भुत होतं.

टीम इंडियामध्ये पुनरागमन करणार का पुजारा ? इंग्लिश काउंटीमध्ये कमाल करतेय चेतेश्वरची फलंदाजी
Follow us
| Updated on: May 19, 2022 | 1:47 AM

नवी दिल्लीः टीम इंडियाचे अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा या काळात इंग्लंडमध्ये आहे. तिथे तो काउंटी चॅम्पियनशिपमध्ये ससेक्स (Sussex) टीममध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी बजावतो आहे. रविवारी इंग्लंडच्या लेस्टरमध्ये ससेक्स आणि लेस्टरशायर काउंटीमध्ये काउंटी मॅचचा शेवटचा सामना पार पडला. इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) च्या झगमगाटापासून दूर चेतेश्वर पुजारा टीम इंडियामध्ये आपल्या पुनरागमनाच्या आशेसह काउंटीमध्ये मेहनत करत आहे. त्याची कामगिरीही चमकदार आहे.

Koo App

Had an amazing initial stint with @sussexccc ? Thank you for the lovely time here. All the best for the T20s. Look forward to being back soo ? #countycricket #ukdiaries

Cheteshwar Pujara (@cheteshwarpujara) 16 May 2022

टी20 मध्ये लक्षणीय पुनरागमनाची आशा

टी20 मध्ये लक्षणीय पुनरागमनाची आशा घेऊन चेतेश्वर पुजारानं स्वदेशी मायक्रो-ब्लॉगिंग मंच Koo ऐपवर ससेक्सच्या कार्यकाळाला अद्भुत असं संबोधलं आहे. तो कू ऐप पर पोस्ट करताना म्हणतो: @sussexccc च्या सोबत काम करणं खरोखर अद्भुत होतं. इथं घालवलेल्या अविस्मरणीय काळासाठी आभार. टी20 साठी ऑल द बेस्ट. लवकरच परतण्यासाठी मी अगदीच उत्सुक आहे.

मध्येच खेळ थांबवावा लागला

या सगळ्याशिवाय, नुकतंच पुजारा आणि त्यांच्या टीममधील ससेक्स खेळाडूंना मैदानावर विचित्र स्थितीला सामोरं जावं लागले. आस्मानी संकटामुळे संघाला काही काळासाठी मध्येच खेळ थांबवावा लागला. स्वत:ला वाचवण्यासाठी खेळाडू मैदानावरच झोपले. ही घटना रविवार 15 मेची आहे. इंग्लंडच्या लेस्टरमध्ये ससेक्स आणि लेस्टरशायर काउंटीदरम्यान मॅचच्या शेवटच्या दिवसाचा खेळ सुरू होता. लेस्टरशायर आपल्या दूसऱ्या डावात फलंदाजी करत होती. यादरम्यान अचानक फलंदाजी करणारा खेळाडू क्रीजवरून बाजूला झाला आणि मैदानावर आडवा झाला. तेवढ्यातच यष्टीरक्षक, गोलंदाज, आणि पंचही आपापल्या जागेवर खाली झोपले. सगळेच एकदम चकीत झाले. लगोलग सगळ्यांना याचं कारणही समजलं. पीचवर मधमाशांचं मोहोळ भिरभिरत होतं.

ट्रॅविस हेडच्या जागी पुजाराला घेतलं

ससेक्स काउंटी क्रिकेट क्लबद्वारे ऑस्ट्रेलियन गोलंदाज ट्रॅविस हेडच्या जागी पुजाराला घेतलं गेलं होतं. यानंतर ते निरंतर धावा करत आहेत. त्यांच्या आतापर्यंतच्या खेळीबाबत बोलायचं तर त्यानं तीन सामन्यांमध्ये डर्बीशायरविरुद्ध के खिलाफ 6 आणि नाबाद 201, वॉर्स्टशायरविरुद्ध 109 आणि 12 आणि डरहमच्या विरुद्ध 203 धावा बनवल्यात. मिडलसेक्सच्या विरुद्ध चालणाऱ्या खेळात, पुजारा 144 धावांवर नाबाद राहिला.

पुनरागमनाच्या शक्यता वाढल्या

पुजाराच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट करियरबाबत बोलायचे, तर त्याने आतापर्यंत 95 टेस्ट मॅचेसमध्ये भारतासाठी 43.87 च्या सरासरीने 6,713 धावा केल्या. यात 32 अर्धशतक आणि 13 शतकं आहेत. याशिवाय त्याने भारतासाठी 5 ओडीआय सामनेही खेळलेत. पुजाराने सतत केलेल्या चांगल्या खेळीने त्याच्या टी20 मध्ये पुनरागमनाच्या शक्यता वाढल्या आहेत.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.