IND vs AFG : भारत-अफगाणिस्तान कसोटी सामन्यानंतर आता वनडे सीरिजचा थरार, पहिली मॅच केव्हा?
India vs Afghanistan Odi Series 2026 : टीम इंडियाने अफगाणिस्तानवर एकमेव कसोटी सामन्यात विजय मिळवला. त्यानतंर आता शुबमनसेना एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज झाली आहे. जाणून घ्या वेळापत्रक.

भारतीय क्रिकेट संघाने 2018 नंतर भारत दौऱ्यावर आलेल्या अफगाणिस्तानवर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात मोठा विजय मिळवला. भारताने 8 जून रोजी शुबमन गिल याच्या नेतृत्वात न्यू चंडीगडमध्ये झालेल्या एकमेव कसोटी सामन्यातील अडीच दिवसात अफगाणिस्तानवर विजय मिळवला. भारताने अफगाणिस्तानवर डाव आणि 300 धावांनी विजय मिळवला. त्यानंतर आता टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे. उभयसंघात एकूण 3 एकदिवसीय सामने खेळवण्यात येणार आहे. तसेच भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात एकदिवसीय मालिका खेळवण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. त्यामुळे चाहत्यांना या मालिकेची प्रतिक्षा लागून आहे. या निमित्ताने या मालिकेचं वेळापत्रक जाणून घेऊयात.
