साडेदहा तासात 32 किमी अंतर पार, दहा वर्षीय जलतरणपटूचा विक्रम

चेन्नई : तामिळनाडू येथील दहा वर्षीय मुलाने अशक्य असे शक्य करुन दाखवलं आहे. या मुलाने 10 तास 30 मिनिटात 32 किलोमीटर पोहण्याचा नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. जसवंत असं या दहा वर्षाच्या मुलाचं नाव आहे. तामिळनाडूच्या थेनी जिल्ह्यात राहणाऱ्या जसवंतने श्रीलंकाच्या तलाईमन्नार ते धुनषकोडीपर्यंत 32 किमीचा पल्ला 10 तास 30 मिनिटात पार केला आहे. “जसवंतने …

, साडेदहा तासात 32 किमी अंतर पार, दहा वर्षीय जलतरणपटूचा विक्रम

चेन्नई : तामिळनाडू येथील दहा वर्षीय मुलाने अशक्य असे शक्य करुन दाखवलं आहे. या मुलाने 10 तास 30 मिनिटात 32 किलोमीटर पोहण्याचा नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. जसवंत असं या दहा वर्षाच्या मुलाचं नाव आहे. तामिळनाडूच्या थेनी जिल्ह्यात राहणाऱ्या जसवंतने श्रीलंकाच्या तलाईमन्नार ते धुनषकोडीपर्यंत 32 किमीचा पल्ला 10 तास 30 मिनिटात पार केला आहे.

“जसवंतने सकाळी 4 वाजता उरुमलाई समुद्र किनाऱ्यापासून पोहण्यास सुरुवात केली आणि सकाळी 9 वाजता आंतरराष्ट्रीय समुद्री सीमेवर पोहचला. तटरक्षक अधिकाऱ्यांनी IMBL च्या माध्यमातून जसवंतवर लक्ष ठेवलं होते. दुपारी 2.30 वाजता जसंवत द्वीपच्या धनुषकोडी येथे पोहचला”, असं तटरक्षक अधिकारी म्हणाले.

, साडेदहा तासात 32 किमी अंतर पार, दहा वर्षीय जलतरणपटूचा विक्रम

जसवंतच्या वयाइतक्या मुलाने दहा तासात पाक स्ट्रेट (Palk Strait) पार करणं म्हणजे कठीण मानलं जातं. असे असूनही जसंवतने ही अशक्यप्राय गोष्टी सत्यात उतरवली आहे. त्यामुळे डीजीपी शिलेंद्र बाबू आणि तटरक्षक अधिकाऱ्यांनी जसवंतचे अभिनंदन केले आणि एक नवा विक्रम केल्यामुळे त्याला शुभेच्छा दिल्या.

एप्रिल 1994 मध्ये इरोडच्या एका तरुणाने पोहण्यामध्ये 16 तासांत तलाईमन्नार ते रामेश्वरमपर्यंत पाक स्ट्रेट पार करण्याचा विक्रम केला होता. यासाठी त्याला अर्जुन पुरस्कार दिला होता आणि 1996 मध्ये गिनीज बुकमध्ये त्याचा नावाची नोंदही करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर जसवंतला प्रोत्साहीत करण्यात आले होते.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *