Tokyo Olympics 2021: आईला वाचवण्यासाठी बॉक्सिंगचा सराव थांबवला, 6 महिन्यांत पुनरागमन करत पदक केलं निश्चित

बॉक्सिंगमध्ये महिलांच्या कॅटेगरीत उपांत्यपूर्व फेरीचा सामना जिंकत भारताची महिला बॉक्सर लवलीनाने सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवत कांस्य पदक पक्क केलं आहे.

Tokyo Olympics 2021: आईला वाचवण्यासाठी बॉक्सिंगचा सराव थांबवला, 6 महिन्यांत पुनरागमन करत पदक केलं निश्चित
लवलीना बोरगोहेन
Follow us
| Updated on: Jul 30, 2021 | 1:42 PM

Tokyo Olympics 20-2021 : भारताला टोक्यो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) मीराबाईनंतर दुसरं पदक निश्चित करुन देणारी महिला बॉक्सर लवलीना बोरगोहेनची (Lovlina Borgohain) कथा सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. किक-बॉक्सिंग सोडून बॉक्सिंगमध्ये आलेल्या लवलिनाने आपल्या आजारी आईची सेवा करण्यासाठी बॉक्सिंगचा सराव करणे देखील थांबवले होते. पण अवघ्या सहा महिन्यांत पुनरागमन करत लवलीनाने ऑलिम्पकमध्ये पदक निश्चित केलं आहे.

लवलीनानं 69 किलो वजनी गटात उपांत्य पूर्व फेरीच्या सामन्यात चीनी ताइपेची बॉक्सर एन.सी. चेनला (N. C. Chen) 4-1 ने पराभूत केलं. या विजयासह तिने सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे बॉक्सिंगच्या नियमानुसार तिने किमान कांस्य पदक पक्कं केलं आहे. भारतासाठी बॉक्सिंगमध्ये ऑलिम्पिक पद पटकावणारी लवलीना दुसरी बॉक्सर ठरली आहे. याआधी लंडनमध्ये 2012 साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत मेरी कोमने कांस्य पदक पटकावले होते.

आईच्या सेवेसाठी बॉक्सिंगचाही त्याग

चार वर्षांतून एकदा होणाऱ्या सर्वात मानाच्या ऑलिम्पिक स्पर्धांसाठी प्रत्येक खेळाडू अनेक महिने दिवस-रात्र सराव करत असतो. पण ऑलिम्पक स्पर्धा ऐन तोंडावर असताना भारताची बॉक्सर लवलीनाच्या आयुष्यात मात्र मोठं संकट आलं. स्पर्धेला काही महिने शिल्लक असताना लवलीनालाच्या आईच्या किडनी ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन होणार होतं. त्यावेळी लवलीनाने बॉक्सिंगचा विचार न करता आईची सेवा करण्यासाठी सरावही थांबवला. आईच्या शस्त्रक्रियेनंतर पुन्हा सरावाची सुरुवात करताच लवलीनाच्या कोचिंग स्टाफमधील काही जणांना  कोरोनाची लागण झाली. त्यामुळे तिला व्हिडीओच्या माध्यमातून प्रशिक्षण घेत सराव करावा लागला. मात्र अखेर या सर्व अडचणींनंतरही तिने ऑलिम्पिकमध्ये शानदार कामगिरी करत पदक पक्क केलं आहे.

किक बॉक्सिंग सोडून बनली बॉक्सर

भारतासाठी ऑलिम्पिक पदक मिळवणारी लवलीना आधापासून बॉक्सर नव्हती. ती आधी किक बॉक्सिंग करायची. तिच्या दोन मोठ्या बहिनी लीमा आणि लीचा या देखील किक बॉक्सर आहेत. त्यामुळे तिनेही किक बॉक्सिंग खेळायला सुरुवात केली होती. पण नंतर तिला खास कामगिरी करता न आल्याने तिने SAI ने ठेवलेल्या बॉक्सिंग ट्रायलमध्ये भाग घेतला. लवलीनाने 2012 पासून बॉक्सिंगची ट्रेनिंग सुरु केली. त्यानंतर मागील 9 वर्षांच्या मेहनतीची फळ तिला आज मिळाले आहे.

मोहम्मद अलीचं पोस्टर पाहून भारावली लवलीना

प्रत्येक महान खेळाडू हा एका महान खेळाडूची प्रेरणा घेऊनच पुढे जात असतो. लवलीनाच्या बाबतीत हा महान खेळाडू होत जगातील महान बॉक्सर मोहम्मद अली. ‘बीबीसी हिंदी’ च्या वृत्तानुसार लवलीनाचे वडिल एकदा पेपरमध्ये गुंडाळून खाऊ घेऊन आले होते. त्यापेपरमध्ये मोहम्मद अलीचा फोटो होता. तो फोटो पाहताच लवलीनाने वडिलांना त्याच्याबद्दल विचारलं. त्यानंतर मोहम्मद अलीच्या कहानीतून प्रेरणा घेत लवलीनानं बॉक्सिंगमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला.

इतर बातम्या:

Tokyo Olympics 2021: बॉक्सर लवलीनाचं पदक निश्चित, सेमीफायनलमध्ये टर्कीच्या बॉक्सरशी भिडणार

Tokyo Olympics 2021: भारताला मोठा झटका, मेरिकोमचा पराभव; ऑलम्पिकमधील दुसऱ्या पदकाच्या आशा संपल्या

Tokyo Olympics 2021: सिंधू, दीपिका कुमारी, पूजा रानीची चमकदार कामगिरी, हॉकी टीमकडून मात्र निराशा, भारतासाठी आजचा दिवस दिलासादायक

(After alot struggle Indias boxer lovlina borgohain secure medal at Tokyo Olympics)

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.