Neeraj Chopra : ‘गोल्डन’ कामगिरीनंतर नीरजचं पहिलं ट्विट, म्हणतो मी अजूनही…

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 08, 2021 | 5:18 PM

भारताचा 'गोल्डन बॉय' नीरज चोप्राने टोक्यो ऑलिम्पिकच्या भालाफेक स्पर्धेत अप्रतिम कामगिरी करत पहिला क्रमांक पटकावला. एथलेटिक्समध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिल्यानंतर नीरजने पहिलं ट्विट करत त्यात आपल्या भावना मांडल्या आहेत.

Neeraj Chopra : 'गोल्डन' कामगिरीनंतर नीरजचं पहिलं ट्विट, म्हणतो मी अजूनही...
नीरज चोप्रा
Follow us

Tokyo Olympic 2021 : शनिवारी (7 ऑगस्ट) भारतात अगदी खेड्यापाड्यांपासून ते शहरापर्यंत सर्वत्र एकच नाव ऐकू येत होतं. सोशल मीडियावर एकाच व्यक्तीच्या फोटोंचा पाऊस पडत होता. ती व्यक्ती म्हणजे नीरज चोप्रा (Neeraj Chopra). टोक्यो ओलिम्पिकमध्ये भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरजने इतिहास रचला. आता या गोष्टीला घडून जवळपास एक दिवस लोटला. पण अजूनही सोशल मीडियावर आणि नाक्या नाक्यावर नीरजचीच चर्चा आहे. नुकतंच नीरजने देखील पहिली सोशल मीडिया पोस्ट करत एक भावनिक ट्विट केलं आहे.

नीरजने या ट्विटमध्ये लिहिलं आहे की, ‘मी अजूनही जिंकण्याची भावना जाणवू शकतो. भारतासह जगभरातून ज्यांनीही मला पाठिंबा आणि प्रेम दिलं त्या सर्वांच धन्यवाद. ज्यांनी ज्यांनी मला इथवर पोहचण्यासाठी मदत केली, त्या सर्वांच धन्यवाद. हे क्षण कायम माझ्यासोबत राहतील. नीरजने या ट्वीटमध्ये पदकासोबत आपले फोटो पोस्ट केले आहेत.’

दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांना पदक समर्पित

ओलिम्पिकमध्ये जिंकलेल्या या सुवर्णपदकाला नीरजने भारताचे दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांना समर्पित केले आहे. जूनमध्ये कोविड-19 ची बाधा झाल्याने मिल्खा सिंग यांचे निधन झाले. भारताने टोक्यो ओलिम्पिकमध्ये सात पदकं जिंकली असून यात एकमेव सुवर्णपदक आहे.

नीरजवर बक्षिसांचा वर्षाव

या ऐतिहासिक विजयानंतर नीरजवर संपूर्ण देशातूंन कौतुकाचा वर्षाव होत आहे. सोबतच त्याला कोट्यवधींची बक्षिसंही जाहीर झाली असून यात रोख रकमेसह, गाडी, घर बनवण्यासाठी मोफत सिंमेट, मोफत हवाईयात्रा अशी अनेक बक्षिसं आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आणि सीएसके संघाने नीरजला एक कोटी रुपये रोख रकम बक्षिस म्हणून दिली आहे. तर इंडिगो एअरलाईन्सने देखील नीरजला सुवर्णपदक विजयानंतर एक वर्षापर्यंत मोफतमध्ये अनलिमिटेड विमान प्रवास करण्याची परवानगी दिली आहे.

गुरुग्राम येथील एका रिअल इस्टेट कंपनीने नीरजला 25 लाख रुपये बक्षिस जाहीर केलं आहे. याशिवाय बांगड़ सिमेंट कंपनीने घर बांधण्यासठी मोफत सिमेंटची घोषणा देखील केली आहे.नीरज चोप्राला महिंद्रा ग्रुपतर्फे नुकतीच मार्केटमध्ये आलेली कार XUV700 देण्याची घोषणा कंपनीचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी ट्वीट करत केली. या सर्वांसह हरियाणा सरकारने 6 कोटी रुपयांचं बक्षीस आणि क्लास वन दर्जाची नोकरी नीरजला देऊ केली आहे. पंजाब आणि मणिपुर सरकारनेही नीरजला बक्षिसाची घोषणा केली आहे.

इतर बातम्या

सोनेरी भालाफेक करणाऱ्या नीरज चोप्राचं ‘मराठा’ कनेक्शन माहित आहे का? भालाफेक तर रक्तात

सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्रावर बक्षिसांचा वर्षाव, कोट्यवधीच्या रोख रकमेसह गाडी आणि बरंच काही

Video: जेव्हा टोकियोच्या मैदानावर तिरंगा फडकला, राष्ट्रगीतानं मैदान दुमदुमलं, पहा गोल्डन बॉय नीरजचा भावूक क्षण

(After winning gold medal at tokyo olympics neeraj chopras first tweet says im still feeling)

Non Stop LIVE Update

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI