Tokyo Olympics 2021: टोक्योत भारताची ‘चांदी’ करुन मीराबाईचा परतीचा प्रवास सुरु, लवकरच भारतात आगमन

भारताची आघाडीची वेटलिफ्टर मीराबाई चानूने (Mirabai Chanu) शनिवारी वेटलिफ्टिंगमध्ये दुसरा क्रमांक पटकावत भारताला रौप्य पदक (India won Silver at tokyo) मिळवून दिले. यंदाच्या ऑलिम्पिकमधील भारताचे हे पहिलेच पदक आहे.

Tokyo Olympics 2021: टोक्योत भारताची 'चांदी' करुन मीराबाईचा परतीचा प्रवास सुरु, लवकरच भारतात आगमन
मीराबाई चानू
Follow us
| Updated on: Jul 26, 2021 | 2:43 PM

टोक्यो : जी कामगिरी करण्यासाठी प्रत्येक खेळाडू ऑलिम्पिक स्पर्धेत जातो, ती कामगिरी भारताची वेटलिफ्टर मीराबाई चानूने (Mirabai Chanu) दुसऱ्याच दिवशी पूर्ण केली. भारताला टोक्यो ऑलिम्पिकमधील (Tokyo Olympic) पहिलं पदक मिळवून देत मीराबाईने यश मिळवलं. कामगिरी फत्ते झाल्याने मीराबाई अजिबात वेळ न घालवता लगेच चौथ्याच दिवशी मायभूमीत परतीसाठी निघाली आहे. तिने घरवापसीची फ्लाइट पकडली असूनन ऑलिम्पिकमध्ये चंदेरी कामगिरी करुन आता ती भारतात परतत आहे.

26 वर्षीय मीराबाईने भारताला वेटलिफ्टिंग स्पर्धेत 49 किलोग्राम वजनी गटात भारताला रौप्यपदक मिळवून दिलं. त्यानंतर आता घरी परतण्यासाठी निघालेल्या मीराबाईने ट्वीट करत आपला विमानतळावरील फोटो शेअर केला आहे. या फोटोला ‘मी आयुष्यातील अविस्मरणीय क्षण सोबत घेऊन घरी परतत आहे. सर्वांचे धन्यवाद’ असे कॅप्शनही दिले आहे.

202 किलो वजन उचलत मिळवलं रौप्य पदक

मीराबाई चानूने 49 किलोग्राम महिला वर्गात कमाल कामगिरी करत रौप्य पदक मिळवलं. तिने स्नॅच आणि क्लीन अँड जर्क राउंडमध्ये मिळून तब्बल 202 किलो वजन उचलत रौप्य पदक पटकावलं आहे. मीराबाईने स्नॅच राउंडमध्ये 87 किलो तर क्लीन अँड जर्कमध्ये 115 किलो वजन उचलत हे यश मिळवलं. तर 49 किलोग्राम वर्गात चीनच्या जजिहु हिने सुवर्ण पदक पटकावलं.

वेटलिफ्टिंगमध्ये ओलिम्पिक पदक जिंकणारी दुसरी भारतीय

ओलिम्पिक सारख्या भव्य मंचावर मीराबाई चानूने अप्रतिम कामगिरी करत रौप्य पदक मिळवलं. याआधी अशी कामगिरी 21 वर्षांपूर्वी म्हणजे 200 च्या सिडनी ओलिम्पिकमध्ये भारताच्या कर्नम मल्लेश्वरीने केली होती. तिने 69 किलो वर्गात कांस्य पदक जिंकत भारताला वेटलिफ्टिंगमधील पहिलं पदक मिळवून दिलं होतं.

हे ही वाचा :

प्रार्थनेसाठी जोडलेल्या हातांनीच टाळ्यांचा कडकडाट, मीराबाई मेडल जिंकताना घरी काय घडलं, पाहा VIDEO

Tokyo Olympics 2021 : मीराबाई चानूने रचला इतिहास, वेटलिफ्टिंगमध्ये भारताला टोक्‍यो ऑलिम्पिकमधील पहिलं पदक

(After wInning silver medal in tokyo Olympic Mirabai Chanu coming to India )

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.