अमेरिकेच्या स्टार टेनिसपटूला कोरोनाची बाधा, Tokyo Olympics मधून घेतली माघार

अमेरिकेची आघाडीची टेनिसपटू कोको गॉफ हीला कोरोनाची बाधा झाल्यामुळे तिने टोक्यो ओलम्पिकमधून माघार घेतली आहे. तिने ट्विट करत याबाबतची माहिती दिली.

अमेरिकेच्या स्टार टेनिसपटूला कोरोनाची बाधा, Tokyo Olympics मधून घेतली माघार
कोको गॉफ
Follow us
| Updated on: Jul 19, 2021 | 12:44 PM

वॉशिंग्टन : मागील वर्षी कोरोनाच्या संकटामुळे पुढे ढकलण्यात आलेली टोक्यो ऑलम्पिक (Tokyo Olympic) यंदा पार पडत आहे. या स्पर्धेसाठी अनेक मातब्बर खेळाडू सज्ज झाले असतानाच टेनिसमध्ये मात्र अनेक दिग्गज खेळाडूंनी माघार घेतली आहे. नदाल, फेडरर यांच्या नंतर प्रसिद्ध अमेरिकन महिला टेनिसपटू कोको गॉफ (Coco Gauff) हिने देखील टोक्यो ओलम्पिकमधून माघार घेतली आहे.

कोकोला कोरोनाची बाधा झाल्यामुळे तिने हा निर्णय घेतला आहे. जगात 25 व्या क्रमांकावर असणारी कोको सण 2000 नंतर ऑलम्पिकमध्ये सहभागी होणारी सर्वात तरुण खेळाडू ठरली असती. मात्र कोरोनाच्या संकटामुळे तिला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. तिने ट्विट करत ही माहिती दिली. ती लिहिलं आहे की , ”मला अत्यंत निराशापूर्व हे सांगावल लागत आहे की मी कोरोनाबाधित आहे. त्यामुळेच मी टोक्यो ऑलम्पिकमध्ये सहभाग घेऊ शकत नाही. मला माझा देश अमेरिकेचे प्रतिनिधित्व करणं हे स्वप्न आहे आणि ते आता नाही तर भविष्यात मी नक्कीच पूर्ण करेन”.

17 वर्षीय कोकोची कमाल

अवघ्या 17 वर्षीय कोकोने नुकत्याच पार पडलेल्या विम्बल्डन स्पर्धेत चौथ्या फेरीपर्यंत मजल मारली होती. चौथ्या राऊंडमध्ये जर्मनीच्या एंजलिक कर्बरने 6-4 आणि 6-4 अशा दोन सेट्समध्ये कोकोला नमवलं. त्यानंतर आता 23 जुलैपासून सुरु होणाऱ्या टोक्यो ऑलम्पिकसाठी कोको सज्ज झाली होती. मात्र कोरोनाची बाधा झाल्यामुळे कोकोला काही काळ तरी विश्रांती करावी लागणार आहे.

प्रसिद्ध टेनिसपटूंची ऑलम्पिकमधून माघार

कोकोप्रमाणेच अनेक दिग्गज टेनिसपटू यंदा ऑलम्पिकमध्ये खेळताना दिसणार नाहीत. यामध्ये नोव्हाक जोकोविच, मेदवेदेव, नाओमी ओसाका, एश्ले बार्टीसह राफेल नदाल आणि रॉजर फेडरर यांचाही समावेश आहे.

हे ही वाचा :

Tokyo Olympics : ऑलम्पिकमध्ये कोरोना धोका वाढताच, दोन आणखी खेळाडू कोरोनाची बाधा

Tokyo Olympics साठी भारतीय बॉक्सर सज्ज, ‘या’ खेळाडूंकडून पदक मिळवण्याची सर्वाधिक आशा

Tokyo Olympics साठी हिमा दास नाही, तर ‘ही’ भारतीय धावपटू पात्र, खेल रत्न पुरस्कारासाठीही शिफारस

(American Star tennis Player Coco Gauff out of Tokyo 2020 after testing Corona Positive)

Non Stop LIVE Update
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.