Tokyo Olympics 2021: भारतीय महिला हॉकी संघाने रचला इतिहास, ओलिम्पिकच्या क्वॉर्टर फायनलमध्ये मिळवली जागा

यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये सुरुवातीच्या काही सामन्यात पराभवानंतर भारतीय महिला हॉकी संघाने पुनरागमन करत विजय मिळवण्यास सुरुवात केली. ग्रुप स्टेजच्या शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवरही भारतीय संघाने विजय मिळवला.

Tokyo Olympics 2021: भारतीय महिला हॉकी संघाने रचला इतिहास, ओलिम्पिकच्या क्वॉर्टर फायनलमध्ये मिळवली जागा
भारतीय महिला हॉकी संघ
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: shashank patil

Jul 31, 2021 | 7:52 PM

Tokyo Olympics 20-2021 : टोक्यो ओलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) भारतीय महिला हॉकी संघासाठी (India’s Women’s Hockey Team) 31 जुलैचा दिवस ऐतिहासिक ठरला. भारतीय महिलांनी हॉकीच्या क्वॉर्टर फायनलमध्ये जागा मिळवली. ऑलिम्पिकच्या इतिहासात भारतीय महिला पहिल्यांदाच क्वॉर्टर फायनलमध्ये पोहोचल्या आहेत. कर्णधार रानी रामपालच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने ग्रुप स्टेजमध्ये 2 सामने जिंकले  तर 3 सामन्यात पराभव पत्करावा लागला. त्यामुळे क्वॉर्टर फायनलमध्ये पोहोचण्यासाठी ग्रेट ब्रिटेन आणि आयर्लंड यांच्यातील सामन्यात आयर्लंडचा पराभव होणे आवश्यक होते.

पूल ए मध्ये भारतीय टीम 5 सामन्यातील 2 सामने जिंकून 6 पॉइंट्ससह चौथ्या स्थानावर होती. त्यामुळे आयर्लंड आजच्या सामन्यात जिंकली असती तर त्यांचे 6 पॉईंट्स झाले असते. पण सरासरीच्या गुणांवर त्यांनी भारताला पछाडलं असतं. पण ग्रेट ब्रिटनने आयर्लंडला 2-0 ने नमवत भारताला पुढच्या फेरीत पोहोचवण्यात मदत केली.

वंदनाची हॅट्रिक, भारताचा विजय

भारत आणि दक्षिण आफ्रीका यांच्यात पहिल्या क्वॉर्टरमध्ये 1-1 असा स्कोर होता. सामन्यात चौथ्या मिनिटाला वंदना कटारियाने पहिला गोल करत भारतीय महिलांना आघाडी मिळवून दिली. त्यानंतर काही वेळातच आफ्रीका संघानेही गोल करत बरोबरी साधली. दुसऱ्या क्वॉर्टरमध्ये देखील तसेच घडले. आधी भारतीय महिलांनी गोल केल्यानंतर पुन्हा आफ्रिकेच्या महिलांनी पलटवार करत 2-2 असा स्कोर केला. तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये दोन्ही संघानी पुन्हा एक-एक गोल केला. ज्यामुळे दोन्ही संघ 3-3 अशा स्कोरवर होते. ज्यानंतर शेवटचा आणि चौथा असा निर्णायक क्वॉर्टर सुरु झाला. ज्यात पुन्हा एकदा वंदना कटारियाची जादू चालली आणि तिने एक अप्रतिम गोल करत भारताला 4-3 ची आघाडी मिळवून दिली. ज्यानंतर आफ्रिका संघाला एकही गोल करता न आल्याने भारतीय महिला विजयी झाल्या.

इतर बातम्या:

Tokyo Olympics 2021: पीव्ही सिंधूला पदक मिळवण्याची शेवटची संधी, असे असेल आव्हान

Tokyo Olympics 2021: बॉक्सर लवलीनाचं पदक निश्चित, सेमीफायनलमध्ये टर्कीच्या बॉक्सरशी भिडणार

Tokyo Olympics 2021: भारताला मोठा झटका, मेरिकोमचा पराभव; ऑलम्पिकमधील दुसऱ्या पदकाच्या आशा संपल्या

(at tokyo olympic Indian women hockey team reaches quarter final 1st time in history)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें