मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंचा होणार लिलाव, ऑलिम्पिकसह पॅरालिम्पिकमधील ऐतिहासिक साहित्य तुम्हीही घरी आणू शकता

नुकत्याच पार पडलेल्या टोक्यो ऑलिम्पिक्स आणि टोक्यो पॅरालिम्पिक्स खेळांमध्ये भारताने इतिहास रचला. भारतीय खेळाडूंनी इतिहासातील सर्वाधिक पदकं यंदा भारताने मिळवली.

मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंचा होणार लिलाव, ऑलिम्पिकसह पॅरालिम्पिकमधील ऐतिहासिक साहित्य तुम्हीही घरी आणू शकता
नरेंद्र मोदी आणि भवानी देवी

नवी दिल्ली: काही महिन्यांपूर्वीच टोक्यो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) स्पर्धा पार पडल्या. त्यानंतर लगेचच टोक्यो पॅरालिम्पिक (Tokyo Paralympic) स्पर्धाही पार पडल्या. या दोन्हींमध्ये भारतीय खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी केली. पॅरालिम्पिकमध्ये भारताने अप्रतिम कामगिरी करत 19 पदकं खिशात घातली. हे भारताचं आतापर्यंतच सर्वोत्कृष्ट प्रदर्शन ठरलं. तर त्याआधी ऑलिम्पिकमध्ये 7 पदक भारताने मिळवली. ही देखी आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी होती. दरम्यान या कामगिरीनंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सर्व खेळाडूंची भेट घेतली होती. ज्यावेळी खेळाडूंनी त्यांना काही भेटवस्तू दिल्या. या सर्व भेटवस्तू लिलावासाठी ठेवण्यात आल्या आहेत. हा सर्व लिलाव ऑनलाईन पार पडणार असून तुम्ही pmmementos.gov.in/ यावर या लिलावात सहभाग घेऊ शकता.

यामध्ये भवानी देवीची तलवारीपासून ते सुहास यांच्या बॅडमिंटन रॅकेटपर्यंत साऱ्याचाच समावेश आहे. हा लिलाव 17 सप्टेंबर रोजी सरु झाला असून 7 ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार आहे. तुम्हीही ऑनलाईन पद्धतीने यामध्ये सहभाग घेऊन या ऐतिहासिक गोष्टी घरी आणू शकता. यासाठी केवळ www.pmmementos.gov.in यावर लॉग ऑन करुन या ई-ऑक्शनमध्ये तुम्हाला सहभाग घ्यायचा आहे. विशेष म्हणजे ही सर्व रक्कम नममी गंगे परियोजनेत दान करण्यात येईल. या योजनेमार्फत गरीब नागरिकांना मदत केली जाते.

भारताची ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी

भारताने यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये सर्वोत्तम कामगिरी करत 7 पदकं जिंकली. या 7 पदकांत 4 कांस्य पदकांसह, 2 रौप्य पदकं आणि एक सुवर्णपदकाचा समावेश आहे. विशेष म्हणजे हॉकी पुरुष संघाने 41 वर्षानंतर ऑलिम्पिक पदक जिंकल. तर एथलेटिक्समध्ये 100 वर्षांत पहिल्यांदा भारताच्या नीरजने सुवर्णपदक जिंकून दिलं. भारत टोक्यो ओलिम्पिकमध्ये पदकं जिंकण्याच्या रेसमध्ये 48 व्या क्रमांकावर राहिला. तर पॅरालिम्पिक स्पर्धेतही भारताने ऐतिहासिक कामगिरी केली. मोठ्या थाटामाटात टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धा 24 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर दरम्यान खेळवण्यात आली. ज्या स्पर्धेत भारताने  19 पदकं मिळवली.

हे ही वाचा

Tokyo Paralympics 2020: स्टार पॅराबॅडमिंटनपटू सुहास यथिराज यांना रौप्य पदक, चुरशीच्या अंतिम सामन्यात सुवर्णपदक थोडक्यात हुकलं

Tokyo Olympics 2021 : भारताची ऑलिम्पिकमधील विक्रमी कामगिरी, अमेरिका आणि चीनचा दबदबा, कुणाला किती पदकं?

Hardik Pandya : मुंबईच्या दोन्ही सामन्यात संधी नाही, हार्दिक पंड्या T 20 विश्वचषकातूनही बाहेर पडणार?

(Auction of pm narendra modis gifts bhavani devis sword and noida dm suhas ly badminton)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI