Tokyo Olympics 2020 साठी रवाना होणाऱ्या भारताच्या शिलेदारांना क्रिकेटपटूंच्या शुभेच्छा, मोदींच्या cheer4india ला साद

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jul 11, 2021 | 5:02 PM

टोक्यो ऑलम्पिक 2020 (Tokyo Olympic 2020) स्पर्धेसाठी भारताकडून 100 हून अधिक खेळाडू क्वॉलिफाय झाले आहेत. 17 जुलैला हे खेळाडू टोक्योसाठी रवाना होणार आहेत.

Tokyo Olympics 2020 साठी रवाना होणाऱ्या भारताच्या शिलेदारांना क्रिकेटपटूंच्या शुभेच्छा, मोदींच्या cheer4india ला साद
पीएम मोदी यांनी सुरु केलेल्या #cheer4india अभियानात भारतीय क्रिकेटर्सही सामिल झाले आहेत.

Tokyo Olympic 2020 : जगातील सर्वांत मानाच्या स्पर्धा असणाऱ्या ऑलम्पिक यंदा जपानच्या टोक्योमध्ये पार पडणार आहेत. या स्पर्धांसाठी सर्व देश आपले आघाडीचे खेळाडू पाठवत आहेत. भारताचे खेळाडूही टोक्यो ऑलम्पिकसाठी (Tokyo Olympics) लवकरच रवाना होणार आहेत. संपूर्ण भारत खेळाडूंना शुभेच्छा देत आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी #cheer4india नावाचे अभियान सुरु केले आहे. या अभियानातंर्गत भारतीय क्रिकेटपंटूनी देखील ऑलम्पिकसाठी रवाना होणाऱ्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत.

ऑलम्पिक स्पर्धा मागील वर्षी आयोजित करण्यात येणार होत्या. पण कोरोनाच्या संकटामुळे स्थगित करुन यंदा घेण्यात येत आहेत.  23 जुलैपासून स्पर्धेला सुरुवात होणार असून भारताचे 100 हून अधिक खेळाडू ऑलम्पिकसाठी पात्र झाले आहेत. भारताच्या हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग (Manprit Singh) आणि लंडन ऑलम्पिकमध्ये कांस्यपदक विजेती बॉक्सर एमसी मेरी कोम (Mary Kom) ऑलम्पिक उद्घाटनवेळी ध्वजवाहक असतील. तर कुस्तीपटू बजरंग पूनिया (Bajrang Puniya) 8 ऑगस्टला स्पर्धेच्या सांगता कार्यक्रमाला भारताचा ध्वजवाहक असेल.

क्रिकेटपटूंनी दिल्या शुभेच्छा

बीसीसीआयने त्यांच्या ट्विटरवरुन एक व्हिडीओ शेेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी ऑलम्पिकसाठी रवाना होणाऱ्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत.  या ट्वि्टमध्ये भारताचे आघाडीचे क्रिकेटपटू खेळाडूंना शुभेच्छा देत आहेत. तसेच सर्वांनी खेळाडूंना सपोर्ट करुन शुभेच्छा द्या असे कॅप्शनही बीसीसीआयने या व्हिडीओला दिले आहे. या व्हिडीओमध्ये मिताली राज, रोहित शर्मा, विराट कोहली, जेमिमा रोड्रिग्स, अजिंक्य रहाणे, हरलीन देओल हे भारतीय क्रिकेटपटू शुभेच्छा देत आहेत.

बीसीसीआयने दिले 10 कोटी रुपये

बीसीसीआयने काही दिवसांपूर्वीच ऑलम्पिक खेळणाऱ्या खेळाडूंच्या तयारी आणि सरावाकरता 10 कोटी रुपयांची मदत केली होती. भारताचे खेळ मंत्रालय आणि भारतीय ऑलम्पिक संघ यांच्याची चर्चा केल्यानंतर या पैशांचा योग्यरित्या वापर केला जाणार आहे.

हे ही वाचा :

Tokyo Olympics 2020 : 40 वर्षांची प्रतिक्षा संपणार, यावेळी भारतीय हॉकी टीम ‘GOLD’ मिळवणारच!

Tokyo Olympics साठी भारतीय बॉक्सर सज्ज, ‘या’ खेळाडूंकडून पदक मिळवण्याची सर्वाधिक आशा

Tokyo Olympics 2020 : हे आहेत स्पर्धेतील सर्वात स्टायलिश खेळाडू, मैदानावर विखुरतात जलवा, फोटो पाहाच

(BCCI Indian Cricketers Joins Pm Modis cheer4india Campaign by Supporting Indian Athletes Going For Tokyo Olympics 2020)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI