Tokyo Olympic च्या 9 दिवसांपूर्वी हॉकीच्या नियमांत मोठा बदल, कोरोनाच्या संकटामुळे घेतला निर्णय

हॉकी इंडियाने Hockey India) काही दिवसांपूर्वीच टोक्यो ऑलम्पिकसाठी (Tokyo Olympic) महिला आणि पुरुष संघ जाहिर केला होता, आता बदललेल्या नियमांमुळे पुन्हा संघबदल करावा लागला आहे.

Tokyo Olympic च्या 9 दिवसांपूर्वी हॉकीच्या नियमांत मोठा बदल, कोरोनाच्या संकटामुळे घेतला निर्णय
भारतीय महिला हॉकी संघ

नवी दिल्ली : टोक्यो ऑलम्पिकमध्ये (Tokyo Olympic) भारताला पदकं मिळवून देण्यासाठी भारतीय खेळाडू जीवंच रान करणार हे नक्की. दरम्यान भारताचा राष्ट्रीय खेळ असणाऱ्या हॉकीमध्ये यंदा भारत मेडल मिळवले अशी शक्यता सर्वचजण वर्तवत आहेत. मागील काही काळातील पुरुष हॉकी संघाचा खेळ पाहता ही आशा वर्तवली जात आहे. मात्र स्पर्धा सुरु होण्यासाठी काहीच दिवस शिल्लक असताना हॉकीच्या नियमांत बदल करुन प्रत्येक हॉकी संघात 16 च्या जागी 18 खेळाडू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यामुळे भारतीय पुरुष हॉकी संघातून डिफेंडर वरुण कुमार (Varun Kumar) आणि मिडफील्डर सिमरनजीत सिंग (Simranjeet Singh) टोक्यो ऑलम्पिकमध्ये डेब्यू करण्यासाठी सज्ज झाले आहेत. बदलेल्या नियमामुळे हॉकी इंडियाने आधी जाहिर केलेल्या 16 खेळाडूंच्या संघात या दोघांना सामिल करुन 18 खेळाडूंचा संघ तयार केला आहे. कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून संघातील खेळाडूंच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. पुरुष संघासह महिला हॉकी संघातही नमिता टोपो आणि रीना या दोन महिला हॉकीपटूंना सामिल करण्यात आलं आहे. भारताच्या महिला संघाचं कर्णधारपद रानी रामपाल (Rani Rampal) तर पुरुष संघाचं कर्णधारपद मनप्रीत सिंग (Manpreet Singh) याला देण्यात आलं आहे.

हॉकीमध्ये भारताला पदकाशी आशा

हे ही वाचा :

Tokyo Olympics 2021 मधून दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररची माघार, ‘हे’ आहे कारण

Tokyo Olympics 2020 मध्ये खेळण्याबाबत नोव्हाक जोकोविच याचे मोठे वक्तव्य, म्हणाला…

Tokyo Olympics 2020 मध्ये सहभागी होणाऱ्या उत्तर प्रदेशातील खेळाडूंसाठी खुशखबर, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांची मोठी घोषणा

(Before Tokyo Olympics Starts Two Extra Players Inculded in Hocky Teams Change in Terms of Hocky Team at Olympics)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI