Tokyo Olympic सुरु होण्यापूर्वीच भारतासाठी आनंदाची बातमी, ‘या’ जगप्रसिद्ध स्पर्धेचे यजमानपद भारताकडे

या स्पर्धेचे यजमानपद 12 वर्षांपूर्वी म्हणजेतच 2009 मध्ये भारताकडे होते. त्यावेळी हैद्राबादमध्ये हे सामने खेळवले गेले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा भारताला हा सन्मान मिळणार आहे.

Tokyo Olympic सुरु होण्यापूर्वीच भारतासाठी आनंदाची बातमी, 'या' जगप्रसिद्ध स्पर्धेचे यजमानपद भारताकडे
2026 साठीच्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेसाठी भारताला यजमानपद मिळाले आहे.

मुंबई : संपूर्ण जगभरात टोक्यो ऑलम्पिकचे (Tokyo Olympics) वारे वाहू लागले आहेत. भारताचे खेळाडूही या स्पर्धांसाठी सज्ज झाले असून देशभरातून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. यातच भारताला 2026 साली पार पडणाऱ्या जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपचे (BWF World Badminton Championship) यजमान पदही मिळाल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. जागतिक बॅडमिंटन महासंघाने (BWF) आपल्या आगामी कार्यक्रमाचे नियोजन मंगळवारी जाहिर केले यामधून ही माहिती समोर आली. भारताला आधी 2023 च्या सुदीरमन कप या स्पर्धेचे यजमानपद मिळणार होते. पण यंदा 2021 चा सुदीरमन कप चीनमध्ये पार पडणार होता जो कोरोनामुळे फिनलँडला घेण्यात आला. त्यामुळे 2023 मध्ये ही स्पर्धा बीडब्ल्यूएफने चीनमध्ये घेण्याची घोषणा केली आहे.

बीडब्ल्यूएफने दिलेल्या माहितीत म्हटलं आहे की,“यंदा कोरोनामुळे चीनमध्ये 2021 सुदीरमन कप (बीडब्ल्यूएफ विश्व मिश्रित संघ चॅम्पियनशिप) खेळवता न आल्याने 2023 मध्ये खेळवला जाईल. त्यामुळे भारतात 2026 ची जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप खेळवण्यात येईल. ”

दुसऱ्यांदा भारताला मान

भारताने याआधी 2009 मध्ये जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपचे यजमानपद भूषवले होते. 2009 मध्ये हे सामने हैद्राबाद येथे खेळवले गेले होते.  भारतीय बॅडमिंटन संघाचे अध्यक्ष हिमंता बिस्वा शर्मा  म्हणाले, “जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपचे सामने भारतात खेळवण्यात येणार आहेत ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. यासाठी आम्ही जागतिक बॅडमिंटन महासंघाचे आभारी आहोत. या आयोजनामुळे बॅडमिंटनला संपूर्ण देशभरात आणखी प्रसिद्ध करण्यास मदत मिळेल.”

सिंधू आहे सध्याची विजेता

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू (P V Sindhu) महिला एकेरीतील विजेता आहे. सिंधूने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत रौप्य आणि कांस्य़ ही पदकं पटकावली आहेत. याशिवाय भारताचा पुरुष बॅडमिंटनपचू बी. साई प्रणीतने दोन वर्षाआधी स्वित्झर्लंडमध्ये पदक जिंकत भारताला 36 वर्षांनतर पुरुष गटात यश मिळवून दिलं होतं. लंडन ऑलम्पिकमध्ये कांस्य पदक विजेत्या बॅडमिंटनपचू सायना नेहवाल (Saina Nehwa) हिने 2015 आणि 2017  मध्ये या स्पर्धेत कांस्य पदक जिंकवून दिले होते.

हे ही वाचा :

प्रवीण तू चॅम्पियन, जपान गाजवून ये, साताऱ्याच्या तिरंदाजाला मोदींचा सल्ला, माता-पित्यांना मराठीत म्हणाले,….

Tokyo Olympics 2020 मध्ये सहभागी होणाऱ्या उत्तर प्रदेशातील खेळाडूंसाठी खुशखबर, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांची मोठी घोषणा

Tokyo Olympics 2020 : 5 व्या वर्षी अनाथ, मजुरी करणाऱ्या आजीने सांभाळलं, सरावासाठी शूजही नव्हते, आता भारताकडून ऑलम्पिक गाजवणार

(BWF World Badmintion Championship Will Hosted By india in 2026)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI