Tokyo Olympic | स्पर्धेदरम्यान घोड्यावर बुक्क्यांनी प्रहार, जर्मन महिला कोच निलंबित

शुक्रवारी महिला मॉडर्ना पेंटाथलॉन स्पर्धेदरम्यान घोड्याला नियंत्रित करण्यासाठी या महिला कोचनं घोड्याला मारहाण केली. या मारहाणीचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं. त्यानंतर या कोचवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

Tokyo Olympic | स्पर्धेदरम्यान घोड्यावर बुक्क्यांनी प्रहार, जर्मन महिला कोच निलंबित
मॉडर्ना पेंटाथलॉन
टोक्यो : टोक्यो ऑलिम्पिक (Tokyo Olympic) स्पर्धेत जर्मनीच्या एका महिला कोचला (Germen Women Coach) घोड्याला मारल्याच्या कारणावरून ऑलिम्पिकमधून निलंबित करण्यात आलं आहे. शुक्रवारी महिला मॉडर्ना पेंटाथलॉन (Modern Pentathlon) स्पर्धेदरम्यान हा प्रकार घडला. घोड्याला नियंत्रित करण्यासाठी या महिला कोचनं घोड्याला मारहाण केली. या मारहाणीचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं. त्यानंतर या कोचवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. (German women’s coach has been suspended from the Tokyo Olympics for hitting a horse at the modern pentathlon)

नेमकं काय घडलं?

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये महिलांची मॉडर्ना पेंटाथलॉन ही घोडेस्वारीची स्पर्धा होती. या स्पर्धेत घोड्यावर बसून विविध कसरती करायच्या असतात. या स्पर्धेदरम्यान जर्मनीची खेळाडू अन्निका श्लेउचं सुवर्णपद हुकलं. स्पर्धेदरम्यान तिची कोच किम रैस्नर तिला मदत करत होती. स्पर्धेच्या शो जम्पिंग राऊंडदरम्यान त्यांचा घोडा सेंट बॉयला नियंत्रित करण्यासाठी किमने त्याला मारलं.

बुक्क्यांनी घोड्याला मारहाण

स्पर्धेनंतर ऑलिम्पिक अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही पाहिले असता कोच किम रैस्नर घोड्याला मारताना स्पष्ट दिसत होती. घोडा नियंत्रणात येत नाही हे म्हणून तिने घोड्याला बुक्क्यांनी मारहाण केली. अशाप्रकारे प्राण्यांवर हिंसा करणं ऑलिम्पिकच्या नियमांच्या विरूद्ध आहे. त्यामुळे नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत तिला या ऑलिम्पिक स्पर्धेतून निलंबित करण्यात आलं आहे.

… म्हणून हुकलं सुवर्णपदक

मॉडर्ना पेंटाथलॉन (Modern Pentathlon) ही अडथळ्यांच्या घोडेस्वारीची स्पर्धा असते. यामध्ये घोड्यावर बसून अडथळे पार करायचे असतात. या स्पर्धेत जर्मनीची खेळाडू अन्निका श्लेउचा घोडा सेंट बॉयने शेवटच्या अडथळ्यावेळी उडी मारली नाही. त्यामुळे अन्निकाचं सुवर्णपदक हुकलं. याच रागातून कोच किम रैस्नरने घोड्याला बुक्क्यांनी मारलं. (German women’s coach has been suspended from the Tokyo Olympics for hitting a horse at the modern pentathlon)

20 मिनीटं आधी दिले जातात घोडे

मॉडर्ना पेंटाथलॉन स्पर्धेत घोडेस्वारांना दिलेल्या निर्धारित वेळेत सगळे अडथळे पार करायचे असतात. त्यासाठी त्यांना स्पर्धेच्या फक्त 20 मिनीटं आधी घोडे दिले जातात. एवढ्या कमी वेळात त्यांना घोड्यांशी ओळख करून त्यांच्यासोबत स्पर्धेत भाग घ्यायचा असतो. हे खरं घोडेस्वारांचं कसब असतं. निलंबित झालेली जर्मनीची कोच किम रैेस्नर हीसुद्धा आधी घोडेस्वार होती. तिने जर्मनीकडून 2004 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत सहभाग घेतला होता.

संबंधित बातम्या :

Breaking: बजरंग बली की जय!! पैलवान बजरंग पुनियाला कुस्तीत कांस्यपदक, कझाकिस्तानच्या पैलवानावर 8-0 ने मात

ऑलिम्पिकमधील सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांमध्ये सोन्या-चांदीचं प्रमाण किती असतं माहितीय का?

Tokyo Olympic 2021 : यंदाच्या ऑलिम्पिकच्या हॉकी स्पर्धेत कोणाला कोणतं पदक?, जाणून घ्या सर्व तपशील

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI