Tokyo Paralympics 2020: भारतासाठी सुवर्णमय सकाळ, बॅडमिंटनपटू कृष्णा नागरला सुवर्णपदक, भारताचं स्पर्धेतील 19 वं पदक

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 05, 2021 | 10:47 AM

भारताचा बॅडमिंटनपटू कृष्णा नागरने फायनलमध्ये अप्रतिम कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले आहे. त्याने भारताला यंदाच्या पॅरालिम्पिकमध्ये पाचवे सुवर्णपदक मिळवून दिले आहे.

Tokyo Paralympics 2020: भारतासाठी सुवर्णमय सकाळ, बॅडमिंटनपटू कृष्णा नागरला सुवर्णपदक, भारताचं स्पर्धेतील 19 वं पदक
कृष्णा नागर

Follow us on

Tokyo Paralympics : भारतीय पॅरा बॅडमिंटनपटूंची टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये (Tokyo Paralympics 2020) सुवर्ण कामगिरी कायम असून प्रमोद भगत पाठोपाठ पॅरा बॅडमिंटनपटू कृष्णा नागरने (Krishna Nagar) यानेही सुवर्णपदक मिळवत भारताची पदक संख्या थेट 19 वर पोहोचलवली आहे. आधी सेमीफायनलच्या सामन्यात ग्रेट ब्रिटनच्या क्रिस्टन कूंब्सला नमवत त्याने फायनल गाठली होती. त्यानंतर फायनलमध्ये SH6 स्पर्धेत हाँगकाँगच्या चू मॅन कई याला  मात देत कृष्णाने सुवर्णपदक खिशात घातलं. कृष्णाने तीन सेट्ममध्ये हा सामना जिंकला. दुसरीकडे भारताचे बॅडमिंटनपटू आणि नोएडाचे DM सुहास यथिराज यांना अंतिम सामन्यात पराभवामुळे रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

कृष्णा आणि चू मॅन कई यांच्यातील सामना सुरुवातीपासून अत्यंत चुरशीचा सुरु होता. पहिला सेट 14 मिनिटांमध्ये कृष्णाने 21-17 च्या फरकाने जिंकला. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये कई याने पुनरागमन करत 21-16 च्या फरकाने सेट आपल्या नावे केला. पण अखेरच्या आणि निर्णायक सेटमध्ये मात्र कृष्णाने कोणतीच चूकी न करता 15 मिनिटांमध्ये सेट 21-17 च्या फरकाने जिंकत सामना आपल्या नावे केला. या विजयासोबतच कृष्णाने सुवर्णपदक जिंकला. विजयानंतर कृष्णाचा आनंद पाहण्याजोगा होता.

कृष्णाला मेहनतीचं फळ

SH6 गटात ज्या खेळाडूंची उंची वाढलेली नसते असे खेळाडू सहभाग घेतात. कृष्णाला आपल्या या आजाराबाबत तो दोन वर्षांचा असताना कळाले. त्यानंतर त्याने संपूर्णपणे खेळासाठी स्वत:ला समर्पित केलं. तो दररोज घरापासून 13 किमी लांब स्टेडियममध्ये जाऊन सराव करत. इतक्या मेहनतीनंतर त्याने आज हे यश मिळवलं आहे.

हे ही वाचा – 

Tokyo Paralympics 2020: प्रमोद भगतचा ‘गोल्डन पॉईंट’ पॅराबॅडमिंटनमध्ये भारताला सुवर्ण पदक

Tokyo Paralympics 2020: भारतीय नेमबाजांकडून पदकांची लयलूट, अवनीपाठोपाठ मनीषने पटकावलं सुवर्ण तर सिंहराज रौप्यपदकाचा मानकरी

(In Badmintons Mens Single Krishna Nagar Won Gold medal For india at tokyo paralympics 2020)

Non Stop LIVE Update

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI