Tokyo Olympics 2021: पीव्ही सिंधूला पदक मिळवण्याची शेवटची संधी, असे असेल आव्हान

भारतासाठी आजच्या दिवसाची सर्वात मोठी निराशा म्हणजे बॅडमिंटनपटू पी.व्ही सिंधूला सेमीफायनलच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे भारताच्या बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदकाच्या आशाही मावळल्या आहेत.

Tokyo Olympics 2021: पीव्ही सिंधूला पदक मिळवण्याची शेवटची संधी, असे असेल आव्हान
पी व्ही सिंधू
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: shashank patil

Jul 31, 2021 | 7:19 PM

Tokyo Olympics 20-2021 : भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूला (PV Sindhu) टोक्यो ओलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics-2020) सेमीफायनच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. शनिवारी  महिला एकेरी वर्गात चीनी ताइपेच्या ताई त्जू यिंग (Tai Tzu Ying) हिने सिंधूला मात देत तिचं सुवर्णपदकासह किमान रौैप्यपदक मिळवण्याचं स्वप्नही तोडलं. पण सेमीफायनलपर्यंत पोहोचल्याने सिंधूला कांस्य पदक मिळण्याची शक्यता असून तिचा कांस्यपदकासाठीचा सामना रविवारी (1 ऑगस्ट) रोजी असेल.

सिंधूचा तिसऱ्या स्थानासाठी अर्थात कांस्य पदकासाठीचा सामना चीनच्या ही हिच्यासोबत असेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना सायंकाळी 5 वाजता असेल. सुवर्णपदक आणि रौप्यपदक जिंकण्याच्या सिंधूच्या आशा मावळल्या असल्यातरी किमान कांस्य जिंकून भारताला यंदाच्या ऑलिम्पकमधील तिसरं पदक मिळवून देण्याचा सिंधूचा प्रयत्न असेल.

सेमी फायनलमध्ये सिंधू पराभूत

सिंधूने सामन्यात सुरुवातीपासून कडवी झुंज दिली पहिल्या सेटमध्ये पुढे असणारी सिंधून हळूहळू मागे पडली आणि नंतर ताईने तिला परत पुढे येऊच न दिल्याने सिंधू पराभूत झाली. दोघांमधील सामना अत्यंत रोमहर्षक झाला. पण ताई हिने आपल्या कमी उंचीचा फायदा घेत सिंधूला कोर्टवर थकवून एक वेगळी रणनीतीने सामना जिंकला. पहिला सेट 21-18 च्या फरकाने जिंकल्यानंतर दुसऱ्या सेटमध्येही ताईने 21-12 च्या फरकाने सेट जिंकत दोन सरळ सेट्समध्ये सिंधूला पराभूत केले.

इतर बातम्या:

Tokyo Olympics 2021: पीव्ही सिंधूचा सेमीफायनलमध्ये पराभव, भारताचं सुवर्णपदकाचं स्वप्न तुटलं

Tokyo Olympics 2021: बॉक्सर लवलीनाचं पदक निश्चित, सेमीफायनलमध्ये टर्कीच्या बॉक्सरशी भिडणार

Tokyo Olympics 2021: भारताला मोठा झटका, मेरिकोमचा पराभव; ऑलम्पिकमधील दुसऱ्या पदकाच्या आशा संपल्या

(In Tokyo Olympic PV Sindhu will play match for bronze medal on 1st august with chinas he)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें