Tokyo Olympics वर कोरोनाचे सावट कायम, सर्बियाचा कोरोनाबाधित खेळाडू जपानमध्ये, विमानतळावरुनच थेट विलगीकरणात

जपानमध्ये असणाऱ्या कोरोनाच्या संकटामुळे त्याठिकाणी ऑलम्पिकचे आयोजन करण्याबाबत अनेक चर्चा केल्या जात होत्या. जपानच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी देखील ऑलम्पिकच्या आयोजनाबाबत शंका व्यक्त केल्या होत्या

Tokyo Olympics वर कोरोनाचे सावट कायम, सर्बियाचा कोरोनाबाधित खेळाडू जपानमध्ये, विमानतळावरुनच थेट विलगीकरणात
टोक्यो ऑलम्पिक 2020
Follow us
| Updated on: Jul 05, 2021 | 6:22 PM

टोक्यो : मागील वर्षी कोरोना संकटामुळे पुढे ढकलण्यात आलेली टोक्यो ऑलम्पिक 2020 (Tokyo Olympics) यंदा घेण्यात येणार आहे. जपान सरकारने ऑलम्पिकबाबतचे सर्व नियोजन करण्यास सुरुवात केली असून काही दिवसांतकच स्पर्धा सुरु होणार आहेत. मात्र स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच पुन्हा एकदा कोरोनाच्या संकटाने ऑलम्पिकचा दार ठोठावलं आहे. ऑलम्पिक खेळण्यासाठी आलेला सर्बियाचा एक खेळाडू कोरोनाबाधित आढळल्याने त्याला विमानतळावरुनच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. मात्र पुन्हा एकदा कोरोनाच्या संकटाने ऑलम्पिकमध्ये शिरकाव केल्याने जपान सरकारची डोकेदुखी वाढली आहे. (In Tokyo Olympics 2020 Corona Virus Issue Arrived With Corona Positive Serbia Athlete Comes To Japan)

जपानमध्ये ऑलम्पिकच्या आयोजनावरुन देशातूनच बराच विरोध होत आहे. तरीदेखील सरकार, आयोजन समिति आणि आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समिति निर्णयावर ठाम आहे. मात्र त्यातच समोर आलेल्या या कोरोनाबाधित सर्बियन खेळाडूमुळे ऑलम्पिकला होणारा विरोध वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जपान्चाय प्रसार माध्यमांच्या मते संबधित खेळाडू सर्बियाचा असून तो रविवारी (4 जुलै) टोक्योला पोहोचला होता. तो नौकायन दलाचा सदस्य असल्याचीही माहिती समोर आली आहे. दरम्यान हा खेळाडू विमानतळावर पोहोचताच तो कोरोनाबाधित असल्याचे समोर आले, ज्यानंतर त्याला त्वरीत विलगीकरणात ठेवण्यात आले.

इतर खेळाडूंना केलं वेगळ, ट्रेनिंग कॅम्प होऊ शकतो रद्द

जपानी अधिकाऱ्यांकडून समोर आलेल्या माहितीनुसार, संबधित कोरोनाबाधित खेळाडूसोबतच्या संघातील इतर सदस्यांनाही वेगवेगळ्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे.  रविवारी (4 जुलै) टोक्यो पोहोचलेल्या या सर्बियाई दलातील खेळाडूंची हनेदा विमानतळावर तपासणी झाली. तेव्हा त्यांच्यातील एक खेळाडू कोरोनाबाधित आढळल्याने त्याला इतरांपासून दूर करण्यात आले. बाकी चौघांना हनेदा एयरपोर्टजवळील एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आले. दरम्यान या संघाला सराव शिबिरात पाठवण्याची शक्यताही कमी असल्याने या सर्वांच्या खेळावर याचा परिणाम होऊ शकतो.

हे ही वाचा :

Tokyo Olympics साठी भारतीय बॉक्सर सज्ज, ‘या’ खेळाडूंकडून पदक मिळवण्याची सर्वाधिक आशा

Tokyo Olympics साठी हिमा दास नाही, तर ‘ही’ भारतीय धावपटू पात्र, खेल रत्न पुरस्कारासाठीही शिफारस

Tokyo Olympics मध्ये आणखी एका भारतीय जलतरणपटूची वर्णी, इतिहासांत पहिल्यांदाच आला ‘हा’ योग

(In Tokyo Olympics 2020 Corona Virus Issue Arrived With Corona Positive Serbia Athlete Comes To Japan)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.