Tokyo Olympics 2021 : भारतीय महिला हॉकी संघाचा ऑलिम्पिक प्रवास खडतर, सलग तिसऱ्या पराभवाचा सामना, ग्रेट ब्रिटेनने 4-1 ने नमवलं

भारतीय पुरुष हॉकी संघाने आपले दोन सामने जिंकत स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले आहे. मात्र महिला संघाने सलग तीन सामन्यात पराभव मिळवल्याने त्यांचा प्रवास खडतर झाला आहे.

Tokyo Olympics 2021 : भारतीय महिला हॉकी संघाचा ऑलिम्पिक प्रवास खडतर, सलग तिसऱ्या पराभवाचा सामना, ग्रेट ब्रिटेनने 4-1 ने नमवलं
भारतीय महिला हॉकी संघ
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: shashank patil

Jul 28, 2021 | 11:15 AM

Tokyo Olympics 20-2021 : टोक्यो ओलिम्पिकमध्ये  (Tokyo Olympics 2020) भारतीय महिला हॉकी संघाला (Indian Women Hockey Team) बुधवारच्या सामन्यात आणखी एका पराभवाचा सामना करावा लागला. ग्रेट ब्रिटनविरुद्ध (Great Britain) खेळलेल्या या सामन्यात भारतीय महिला 4-1 ने पराभूत झाल्या. हा भारतीय संघाचा सलग तिसरा पराभव होता. सर्वात पहिल्या सामन्यात नेदरलँडकडून 5-1 ने त्यानंतर जर्मनीकडून 2-0 पराभव मिळाला होता. या पराभवामुळे पुढील फेरीतील प्रवेश अवघड झाला असून भारतीय महिलांना उपांत्यपूर्व फेरीत प्रवेशासाठी पुढील दोन्ही सामने चांगल्या फरकाने जिंकणे अनिवार्य आहे.

सामन्यात सुरुवातीपासूनच ग्रेट ब्रिटन संघाने आपला दबदबा कायम ठेवला होता. सुरुवातीच्या 75 सेकंदातच गोल करत ब्रिटनने आघाडी घेतली. त्यानंतर संपूर्ण सामन्यात ब्रिटनने सामन्यावरील पकड सैल होऊ न देता भारतावर दबाव कायम ठेवला. भारताने सामन्यात पुनरागमन करण्याचा भरपूर प्रयत्न केला. भारताला तीन पेनल्टी कॉर्नर मिळाले ज्यातील एकात भारताच्या शर्मिलाने गोल देखील केला.

तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये भारताची आक्रमक सुरुवात

तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये भारताने आक्रमक सुरुवात केली. पहिल्या काही मिनिटात तीन पेनल्टी कॉर्नर मिळवले पण एकातही भारत गोल करु शकला नाही. काही वेळातच ग्रेट ब्रिटनच्या संघाने मात्र पेनल्टी कॉर्नरवर गोल मिळवला.  41 व्या मिनिटाला हा गोल करत सामन्यात आणखी आघाडी घेतली.

चौथ्या क्वॉर्टरमध्ये भारताची निराशाजनक सुरुवात

भारताने चौथ्या क्वॉर्टरमध्ये सामन्याक बरोबरी साधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण सुरुवातच खराब झाल्याने भारत पिछाडीवर पडला. नवजोत कौरला यलो कार्ड देखील मिळालं. त्यामुळे भारताला 10 खेळाडू घेऊनच खेळाव लागलं. ज्यानंतर ग्रेट ब्रिटेनने सहज गोल्स करत सामना 4-1 खिशात घातला.

हे ही वाचा

Tokyo Olympics 2021: पीव्ही सिंधूचं पदकाच्या दिशेने आणखी एक पाऊल, दुसरा सामना जिंकत बाद फेरीत दाखल

Tokyo Olympics 2021: ‘या’ ज्युदोपटू विरोधात खेळण्यापेक्षा दोन खेळाडूंची ऑलिम्पिकमधूनच माघार, ‘हे’ आहे कारण

Tokyo Olympics 2021: भारताची बॉक्सर लवलीना पदकापासून एक पाऊल दूर, उपांत्यपूर्व फेरीत दाखल

(In tokyo Olympics indian women hockey team lost with 4-1 against Great-britain )

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें