Tokyo Olympic 2021 : पैलवान बजरंग पुनिया पदकापासून एक पाऊल दूर, सेमीफायनलमध्ये दिमाखात प्रवेश

भारताचा आघाडीचा पैलवान बजरंग पुनिया कुस्तीमध्ये धमाकेदार खेळ करत थेट सेमीफायनलपर्यंत पोहोचला आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात त्याने किर्गिस्तानच्या एर्नाजर अकमतालीएवचा पराभव केला.

Tokyo Olympic 2021 : पैलवान बजरंग पुनिया पदकापासून एक पाऊल दूर, सेमीफायनलमध्ये दिमाखात प्रवेश
बजरंग पुनिया
Follow us
| Updated on: Aug 06, 2021 | 10:42 AM

Tokyo Olympic 2021 : भारताने गुरुवारी (5 ऑगस्ट) एका दिवसांत दोन पदकं मिळवल्यानंतर आजही भारताला एक पदक मिळण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत. भारताचा आघाडीचा पैलवान बजरंग पुनियाने (Bajrang Puniya) धमाकेदार खेळ करत 65 किलो वजनी गटात सेमीफायनल गाठली आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात त्याने इराणच्या मोर्तेजा घियासीला (Morteza Ghiasi) नमवत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे.

पुनिया आणि घियासी यांच्यातील सामना अत्यंत उत्कटांवर्धक झाला. सुरुवातीपासून दोन्ही खेळाडू एकमेंकावर तगडे डाव टाकत होते. सामन्याच्या सुरुवातीला घियासीने आघाडी घेतली. पहिल्या डावानंतर बजरंग पुनिया 0-1 ने पिछाडीवर होता. मात्र, दुसऱ्या डावात पुनियाने पुनरागमन करत शेवटच्या काही क्षणात उत्कृष्ट डाव दाखवत घियासीला 2-1 ने धोबीपछाड केले. त्याआधी पुनिया किर्गिस्तानच्या एर्नाजर अकमतालीएवचा (E Akmataliev) या पैलवानाला नमवून उपांत्यपूर्व फेरीत आला होता.

सेमीफायनलमध्ये तगडे आव्हान

बजरंग समोर आता सेमीफायनल जिंकून पदक पक्क करण्याची संधी आहे. त्यासाठी सेमीफायनलमध्ये त्याच्यासमोर अझरबैजानचा हाजी अलीयेब (Haji Aliyev) याचं आव्हान आहे. अलीयेवने रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकल होतं. तसेच 61 किलो वजनी गटात तो तीन वेळा विश्वविजेता राहिला असल्याने पुनियाला त्याच्याविरुद्ध दमदार खेळ दाखवावा लागणार आहे

हे ही वाचा :

रवी दहियाचं गोल्ड हुकलं, तिहार जेलमध्ये सुशीलकुमारला अश्रू अनावर

Tokyo Olympic 2021 : पैलवान रवी दहियाची धडाकेबाज कामगिरी, कुस्तीत रौप्य पदकाची कमाई

Tokyo Olympic 2020 : ‘चक दे इंडिया’, 41 वर्षानंतर हॉकीमध्ये पदक, भारताचा जर्मनीवर 5-4 ने विजय

(In Tokyo Olympics Wrestling Indian Wrestler Bajrang Punia into semifinals after defeating Kyrgyzstans E Akmataliev )

Non Stop LIVE Update
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.