Tokyo Paralympics मध्ये भारताची सुवर्ण भालाफेक, सुमित अंतिलने जिंकलं सुवर्णपदक, दिवसभरातील पाचवं पदक

भारताने टोक्यो पॅरालिम्पिक्समध्ये आणखी एक सुवर्णपदक खिशात घातलं आहे. भारताचा भालाफेकपटू सुमित अंतिलने पुरुष भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकत भारताची पदकसंख्य़ा सात केली आहे.

Tokyo Paralympics मध्ये भारताची सुवर्ण भालाफेक, सुमित अंतिलने जिंकलं सुवर्णपदक, दिवसभरातील पाचवं पदक
सुमित अंतिल
Follow us
| Updated on: Aug 30, 2021 | 5:19 PM

Tokyo Paralympics 2020: टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये (Tokyo Paralympic 2020) भारतासाठी आजचा दिवस अगदी सुवर्णमय ठरत आहे. भारताने सकाळपासून स्पर्धेत दुसरं सुवर्णपदक जिंकलं असून दिवसभरातील हे पाचवं पदक आहे. भारताचा भालाफेकपटू सुमित अंतिलने (Sumit Antil) पुरुष भालाफेक F64 स्पर्धेत एका नव्या वर्ल्ड रेकॉर्डसह सुवर्णपदक पटकावलं आहे. यंदाच्या पॅरालिम्पिकमधील हे भारताचं दुसरं सुवर्णपदक असून आज सकाळीच महिला नेमबाज अवनी लेखराने (Avani Lekhara) महिलांच्या 10 मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदक जिंकल होतं.

सुमितने सुवर्णपदक जिंकलेल्या स्पर्धेत एकदा नाही, दोनदा नाही तर तीन वेळेस स्वत:चेच वर्ल्ड रेकॉर्ड तोडले. स्पर्धेत सहा प्रयत्नातील पहिला थ्रो सुमितने 66.95 मीटर लांब फेकला. या थ्रोसह त्याने 2019 मध्ये दुबईत बनवलेले स्वत:चे रेकॉर्ड तोडले. दुसरा थ्रो त्याने 68.08 मीटर लांब फेकला ज्यानंतर तिसरे आणि चौथा प्रयत्न इतका खास झाला नाही. पण पाचव्या प्रयत्नात अप्रतिम असा 68.55 मीटरचा थ्रो करत त्याने सुवर्णपदकाला गवासणी घातली. सोबतच एक नवं वर्ल्ड रेकॉर्डही सेट केलं.

पैलवान होणार होता सुमित

सुमित कायमच पैलवान होऊन कुस्ती खेळू इच्छित होता. पण एका अपघातात त्याचं हे स्वप्न तुटलं. योगेश्वर दत्त यांना पाहून कुस्ती शिकणाऱ्या सुमितचं 2015 मध्ये रोड एक्सीडंट झालं. तो दुचाकीवरुन जात असताना एका ट्रॅक्टरचा धक्का लागला. ज्यात ट्रॅक्टर त्याच्या पायावर चढला आणि तो पाय गमावून बसला. पण त्यानंतरही त्याने मेहनत घेत भालाफेक खेळांत स्वत:ला झोकून दिलं. ज्यानंतर आज अखेर सुवर्णपदक जिंकत भारताचं नाव जगभरात केलं आहे.

2019 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्येही चमकला होता सुमित

सुमित अंतिलने द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित प्रशिक्षक नवल सिंह यांच्या सांगण्यावर भालाफेक खेळण्यास सुरुवात केली. त्यानंतर 2018  मध्ये त्याने आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सहभाग घेतला. पण 5 व्या क्रमांकावर आल्याने त्याचं पदक हुकलं. अखेर 2019 मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्याने रौप्य पदक जिंकत पॅरालिम्पिक्स खेळांसाठीही पात्रता मिळवली.

संबंधित बातम्या  

Tokyo Paralympics : भारताची पदकांची लयलूट, नेमबाजीत सुवर्ण, थाळीफेकीत रौप्य, भालाफेकीतही दोन पदकं!

Tokyo Paralympics 2020 : भारताच्या अवनी लेखराचा सुवर्णवेध, पंतप्रधान मोदींनी ट्विटरवरुन केलं कौतुक

(In Tokyo Paralympics Mens Javelin Throw Sumit Antil wons gold medal)

Non Stop LIVE Update
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा.
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल.
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा.
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन.
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?.
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?.
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट.
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार.
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग.