Tokyo Olympics 2021: दीपिका कुमारीची विजयी सुरुवात, 6-0 ने मिळवला विजय

तिरंदाजीच्या महिला एकेरी स्पर्धेत जगातील एक नंबरची तिरंदाज दीपिकाने पहिल्याच सामन्यात विजय मिळवत दुसरी फेरी गाठली आहे.

Tokyo Olympics 2021: दीपिका कुमारीची विजयी सुरुवात, 6-0 ने मिळवला विजय
deepika kumari

Tokyo Olympics 20-2021 : जगातील अव्वल क्रमाकांची महिला तिरंदाज असणाऱ्या दीपिका कुमारीने टोक्यो ओलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics-2020) महिला पुरुष एकेरी स्पर्धेची चांगली सुरुवात करत पहिला सामना 6-0 च्या फरकाने जिंकला. तिने Trashiyangtse च्या करमा हिला नमवत हा विजय मिळवला.

पहिले दोन्ही सेट जिंकत दीपिकाने  सामन्यात दबदबा निर्माण केला होता. पहिला सेटमध्ये दीपिकाने 26 गुण मिळवले. तर करमा केवळ 23 गुणचं मिळवू शकली. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्येही दीपिकाने 26 आणि करमाने 23 गुण मिळवले. त्यामुळे दीपिकाने सामन्यात 2-0 ची आघाडी घेतली. तिसऱ्या सेटमध्ये दीपिकाने खेळ आणखी उंचावत 27 गुण मिळवले तर करमा 24 गुणांसह पराभूत झाली. ज्यामुळे अखेर सामन्यात दीपिकाने 6-0 ने विजय मिळवला.

हे ही वाचा

Tokyo Olympics 2021: पीव्ही सिंधूचं पदकाच्या दिशेने आणखी एक पाऊल, दुसरा सामना जिंकत बाद फेरीत दाखल

Tokyo Olympics 2021 : भारतीय महिला हॉकी संघाचा ऑलिम्पिक प्रवास खडतर, सलग तिसऱ्या पराभवाचा सामना, ग्रेट ब्रिटेनने 4-1 ने नमवलं

(Indian archer deepika kumari won her first match at tokyo Olympics)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI