Tokyo Olympics 2021: मेरी कोमचा विजयी ‘Punch’, ऑलिम्पिकच्या पहिल्याच सामन्यात दणदणीत विजय

भारताची आघाडीची बॉक्सर मेरी कोमने टोक्यो ऑलिम्पकची सुरुवात दणक्यात केली आहे. पहिल्याच सामन्यात 4-1 च्या दमदार फरकाने विजय मिळवत मेरीने सामना आपल्या नावे केला आहे.

Tokyo Olympics 2021: मेरी कोमचा विजयी 'Punch', ऑलिम्पिकच्या पहिल्याच सामन्यात दणदणीत विजय
मेरी कोम
Follow us
| Updated on: Jul 25, 2021 | 7:01 PM

Tokyo Olympics 20-2021 : भारताची आघाडीची बॉक्सर मेरी कोमने (Mary Kom) टोक्यो ऑलिम्पिकच्या (Tokyo Olympics) सलामीच्या सामन्यात शानदार विजय मिळवत स्पर्धेची सुरुवात केली आहे. राउंड ऑफ 32 च्या सामन्यात 6 वेळा वर्ल्ड चॅम्पियन राहिलेली डॉमिनिक रिपब्लिकची महिला बॉक्सर मिग्यूलिना   (Miguelina Hernandez) हिला नमवत मेरीने आपला पहिला विजय मिळवला आहे. मेरीने महिलांच्या 51 किलोग्राम वजनी गटात हा सामना 4-1 च्या फरकाने जिंकला आहे.

मेरीने सामन्याची सुरुवातच एका विशिष्ट रणनीतीने केली. आपल्या दांडग्या अनुभवाच्या मदतीने मेरीने सर्व सामना खेळला. सुरुवातीपासून बचावात्मक खेळ करत मेरीने सामन्यात वर्चस्व कायम ठेवले. 3 राउंडच्या सामन्यात मेरीने पहिला राउंडमध्ये अगदी धीमा खेळ केला. या राउंडमध्ये आपली एनर्जी वाचवून मेरीने राउंड पूर्ण केला.

दुसऱ्या राउंडमध्ये चुरशीची टक्कर

दुसऱ्या राउंडमध्ये मेरी कोमने आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली. मात्र प्रतिस्पर्धी खेळाडूने देखील आक्रमक खेळ करत सामन्यात चुरशीची टक्कर दिली. दुसरा राउंड समाप्त होताना दोघींचा स्कोर समान होता. कारण 2 परीक्षकांनी मेरीला 10-10 तर दोन परीक्षकांनी हेरनांडिजला 10-10 गुण दिले होते.

तिसरा राउंड ठरला निर्णायक

दुसरा राउंड बरोबरीत सुटल्यानंतर तिसऱ्या राउंडमध्ये मेरीने पूर्ण ताकद लावत सामन्यात वर्चस्व प्रस्थापित केलं.  मेरीने आक्रमक बॉक्सिंगचं प्रदर्शन करत राउंडमध्ये अप्रतिम विजय मिळवला आणि अखेर 4-1 अशा दमदार फरकाने सामनाही आपल्या नावे केला. या विजयामुले मेरीचा पदकाच्या दिशेकडील प्रवास आणखी सुकर झाला आहे.

हे ही वाचा :

Tokyo Olympics 2021: शानदार! अवघ्या 28 मिनिटात सिंधू विजयी, सलामीच्या सामन्यात विजयाने सुरुवात

रिओमध्ये हुलकावणी, डिप्रेशनने गाठलं, मात्र टोकियोमध्ये कमाल केली, मीराबाईच्या रौप्य विजयाच्या 10 खास गोष्टी

Tokyo Olympics 2021 : मीराबाई चानूने रचला इतिहास, वेटलिफ्टिंगमध्ये भारताला टोक्‍यो ऑलिम्पिकमधील पहिलं पदक

(Indian Boxer Mary Kom Won first match in 51 kg category at Tokyo Olympics)

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.