Tokyo Olympic 2021 : महिल गोल्फमध्ये भारताला पदकाची आशा, गोल्फर आदिती अशोकची उत्कृष्ट कामगिरी

टोक्यो ऑलिम्पकमध्ये महिला खेळाडू उत्तम कामगिरी करत आहेत. आतापर्यंत भारताने मिळवलेल्या 4 एकेरी खेळाती 3 पदकं ही महिलांनी मिळवून दिली आहेत.

Tokyo Olympic 2021 : महिल गोल्फमध्ये भारताला पदकाची आशा, गोल्फर आदिती अशोकची उत्कृष्ट कामगिरी
अदिती अशोक
Follow us
| Updated on: Aug 05, 2021 | 7:46 PM

Tokyo Olympics 2021 : टोक्यो ओलिम्पिक (Tokyo Olympics-2020) स्पर्धेत भारताच्या रणरागिनी उत्कृष्ट प्रदर्शन करत आहेत. आतापर्यंत पुरषांच्या तुलनेत महिला खेळाडूंनी अधिक पदकं भारताला यंदाच्या ऑलिम्पकमध्ये मिळवून दिली आहेत. भारताने आतापर्यंत पाच पदकं मिळवली आहेत. यातील चार ही एकेरी सामन्यातील असून त्यातील 3 महिलांनी तर 1 पदकम पुरुष खेळाडूने पटकावलं आहे. दरम्यान भारताची आणखी एक महिला खेळाडू देशाला पदक मिळवून देण्याची आशा निर्माण झाली आहे. भारताची गोल्फर अदिती अशोक (Aditi Ashok) गोल्फ खेळात दिलासादायक प्रदर्शन करत असून दुसऱ्या राउंडच्या अखेरीस ती  संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहे. दोन राउंडनंतर तिचा एकूण स्कोर 133 आहे.

दुसऱ्या स्थानावर अदितीसोबत डेन्मार्कची नेना कोर्स्ट्ज मॅडसन आणि एमिली क्रिस्टीन पेडरसन आहेत. मॅडसन पाच स्थानांची बढत घेऊन दुसऱ्या स्थानावर आली आहे. तर  पेडेरसन 14 स्थानांची बढत घेत पुढे आली आहे. मॅडसनने पहिल्या राउंडमध्ये 69 तर दुसऱ्या राउंडमध्ये 70 गुण मिळवले. अदिती पहिल्या राउंडमध्ये 67 आणि दुसऱ्या राउंडमध्ये 66 गुण मिळवले आहेत.

पदकाची आशा कायम

23 वर्षीय आदितीने दुसऱ्या फेरीत पाच बर्डी लगावल्या. अदितीने दुसऱ्या, 5 व्या, 15 व्या, 17 व्या आणि 18 व्या होलमध्ये बर्डी करत भारतासाठी पदकाच्या आशा कायम ठेवल्या. आदिती दुसऱ्यांदा ऑलिम्पकमध्ये सहभाग घेत असून याआधी तिने रिओ ऑलिम्पकमध्ये सहभाग घेतला होता. आदिती सध्या अमेरिकेती गोल्फर नेली कोर्डापेक्षा चार शॉट्स मागे आहे. यावेळी आदितीने आपली प्रतिक्रिया दिली असून ती म्हणाली, ‘‘शेवटच्या तीन होलात मी काही  शॉट्स वाचवले ज्याने माझा स्कोर वाढला. या संपूर्ण आठवड्यात बऱ्याच खेळाडूंनी बर्डी केली,  विशेष म्हणजे वातावरण गरम असल्याने खेळासाठी वातावरण चांगलं आहे.’’

हे ही वाचा :

Tokyo Olympic 2021 : पैलवान रवी दहियाची धडाकेबाज कामगिरी, कुस्तीत रौप्य पदकाची कमाई

Tokyo Olympic 2020 : ‘चक दे इंडिया’, 41 वर्षानंतर हॉकीमध्ये पदक, भारताचा जर्मनीवर 5-4 ने विजय

(Indian Golfer aditi ashok finished second round with tied 2nd position in race of olympic medal at golf)

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.