Tokyo Olympics 2020 : हॉकी, बॉक्सींगमध्ये भारताला दिलासा, नेमबाजीत मात्र निराशा, असा होता आजचा ऑलिम्पिकमधील दिवस

भारतासाठी आजचा दिवस काहीसा सुखद तर काहीसा दुखद असा गेला. एकीकडे निशानेबाजीमध्ये पदक मिळवण्याची संधी हुकली. मात्र भारतीय हॉकी संघाने स्पर्धेतील दुसरा विजय मिळवला. तर बॉक्सर लवलीनानेही उपांत्यपूर्व फेरीत धडक घेतली.

Tokyo Olympics 2020 : हॉकी, बॉक्सींगमध्ये भारताला दिलासा, नेमबाजीत मात्र निराशा, असा होता आजचा ऑलिम्पिकमधील दिवस
भारताची टोक्यो ऑलिम्पिकमधील आजच्या दिवसाचा लेखाजोखा
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: shashank patil

Jul 27, 2021 | 6:33 PM

Tokyo Olympics 20-2021 : टोक्यो ओलिम्पिक 2020 (Tokyo Olympics-2020) मध्ये मंगळवारचा दिवस भारतासाठी संमिश्र ठरला. आज भारतीय नेमबाजांची जोडी 10 मीटर एअर पिस्टल स्पर्धेत पदक जिंकवून देईल अशी आशा होती. मात्र त्यांच्या पदरी निराशाच आली. पण दुसरीकडे भारतीय पुरुष हॉकी संघाने स्पर्धेतील तिसरा सामना जिंकत स्पेनला 3-0 ने मात दिली. तर महिला बॉक्सर लवलीनानेही जर्मनीच्या बॉक्सरला नमवत उपांत्यपूर्व फेरी गाठली.

पाचव्या दिवशी भारतीय खेळाडूंनी केलेला लेखाजोखा

निशानेबाजीत निराशा

टोक्यो ऑलिम्पिकमधील भारताची आजची सुरुवात नेमबाजीच्या स्पर्धेने झाली. 10 मीटर एअर पिस्टल स्पर्धेत भारताच्या दोन जोड्या उतरल्या होत्या यामध्ये मनु भाकर आणि सौरभ चौधरीसह अभिषेक वर्मा आणि यशस्विनी सिंह देसवाल यांची जोडी मैदानात होती. अभिषेक आणि देसवाल जोडी पहिल्या पात्रता फेरीच्या राउंडमध्येच पराभूत झाली. मनु आणि सौरभची जोडी मात्र पात्रता फेरीच्या राउंडमध्ये अव्वल येत दुसऱ्या फेरीत पोहोचली. मात्र दुसऱ्या सामन्यात पराभव मिळाल्याने भारताची पदकाची अपेक्षाही मावळली. अभिषेक वर्मा आणि यशस्विनी यांच्या जोडीने पहिल्या फेरीत 564 गुण मिळवत 17 व्या स्थानावर राहिले. तर सौरभ आणि मनुची जोडी 581 स्कोर करत अव्वल स्थानावर होती. पण दुसऱ्या फेरीत 380 स्कोर मिळवल्याने सौरभ, मनुची जोडी सातव्या स्थानावर राहिली. ज्यामुळे टॉप 4 मध्ये जागा न मिळवता आल्याने सौरभ, मनु स्पर्धेबाहेर गेले.

यानंतर 10 मीटर एअर रायफल मिक्स्ड स्पर्धेत भारताची जोडी दिव्यांश सिंह पवार आणि इलावेनिल वालविरानची जोडी 626.5 गुण मिळवत 12 व्या स्थानावर होती. तर अंजुम मोदगिल-दीपक कुमार जोडी 623.8 चा स्कोर करत 18 व्या स्थानावर होती. टॉप-8 जोड्याच पुढील फेरीत जात असल्याने भारत स्पर्धेबाहेर गेला.

हॉकीमध्ये भारताचा विजय

भारतीय पुरुष हॉकी संघाने दुसरा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1-7 च्या फरकाने गमावला. त्यानंतर मात्र आजच्या सामन्यात पुनरागमन करत स्पेनवर 3-0 च्या फरकाने विजय मिळवला. सामन्यात 14 व्या मिनिटाला सिमरनजीत गोल करत भारताला पहिली आघाडी मिळवून दिली. त्यानंतर रूपिंदर पाल सिंहने दोन गोल करत सामना 3-0 ने भारताला जिंकवून दिला.

टेबल टेनिसमध्ये अचंता पराभूत

भारताचा दिग्गज टेबल टेनिस खेळाडू अचंता शरत कमल पुरुष एकेरीच्या सामन्यात तिसऱ्या फेरीत चीनच्या मा लोंगकडून पराभूत झाला. अचंताने दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात शानदार टक्कर दिली. पण अखेर सामना लोंगने 4-1 (11-7, 8-11, 13, 11, 11-4, 11-4) च्या फरकाने जिंकला.

बॅडमिंटनमध्ये दुर्देवी पराभव

सात्विकसाइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने पुरुष दुहेरीत उत्कृष्ठ खेळ करत ब्रिटनच्या बेन लेन आणि सीन वेंडी जोडीला 21-17, 21-19 च्या फरकाने मात दिली. पण तरीदेखील उपांत्यपूर्व फेरीत भारत पोहचू शकला नाही. कारण प्रत्येक ग्रुपमधून दोनच संघ पुढच्या फेरीत जातात. भारत असलेल्या ग्रुपमधून तायवान आणि इंडोनेशिया पुढच्या फेरीत गेल्याने तिसऱ्या नंबरवरील भारत स्पर्धेबाहेर गेला.

बॉक्सींगमझ्ये लवलिनाचं यश

टोक्यो ओलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) भारताचे पुरुष बॉक्सर काही खास कामगिरी करु शकले नसताना महिला बॉक्सर मात्र उत्तम कामगिरी करताना दिसत आहेत. दिग्गज बॉक्सर मेरी कोमने पहिला सामना जिंकत विजयी सुरुवात केली. तर दुसरीकडे बॉक्सर लवलीना बोरगोहेन (Lovlina Borgohain) जर्मनीविरुद्ध विजयासह उपांत्यपूर्व फेरीत पोहोचली आहे. राउंड ऑफ 32 मध्ये बाय मिळाल्यानंतर राउंंड ऑफ 16 च्या सामन्यात लवलीनाने जर्मनीच्या एपेट्ज नेदिनला 3-2 च्या फरकाने पराभूत करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. त्यामुळे आणखी एक सामना जिंकताच लवलीना उपांत्य फेरीत पोहचेल. ज्यामुळे तिचे किमान कांस्यपदक निश्चित होईल.

हे ही वाचा

Tokyo Olympics 2021: ‘या’ ज्युदोपटू विरोधात खेळण्यापेक्षा दोन खेळाडूंची ऑलिम्पिकमधूनच माघार, ‘हे’ आहे कारण

Tokyo Olympics 2021: भारताची बॉक्सर लवलीना पदकापासून एक पाऊल दूर, उपांत्यपूर्व फेरीत दाखल

Tokyo Olympics: भारताचा स्पेनवर 3-0 ने विजय, रुपिंदरपालसिंह सामन्याचा हिरो, हॉकीत भारताचा दुसरा विजय

(Indian Hocky team and lovlina borgohain won today this are indias fourth day Olympics result)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें