Tokyo Olympics 2021: भारतीय हॉकी संघाची विजयी घोडदौड सुरुच, जपानवर 5-3 ने मात

भारतीय पुरुष हॉकी संघाने ग्रुप स्टेजमधील आपली अप्रतिम कामगिरी कायम ठेवली आहे. ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध सोडता भारताने सर्व संघाना नमवत पुढील फेरीत प्रवेश मिळवला आहे.

Tokyo Olympics 2021: भारतीय हॉकी संघाची विजयी घोडदौड सुरुच, जपानवर 5-3 ने मात
भारत विरुद्ध जपान
Follow us
| Updated on: Jul 30, 2021 | 6:21 PM

Tokyo Olympics 20-2021 : टोक्यो ओलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) भारतासाठी शुक्रवारचा (30 जुलै) दिवस चांगला ठरला. भारताची बॉक्सर लवलीना बोरगोहेनने (Lovlina Borgohain) सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवत दुसरं पदक भारतासाठी निश्चित केलं आहे. सोबतच बॅडमिंटनमध्ये पीव्ही सिंधूने देखील (PV Sindhu) अप्रतिम विजय मिळवत सेमीफायनलमध्ये जागा निश्चित केली आहे. या दोघींसोबत भारतीय पुरुष हॉकी संघाने आपली विजयी घोडदौड कायम ठेवत स्पर्धेतील चौथा विजय मिळवला.

भारतीय पुरुष संघाने (Indian Men Hockey Team) स्पर्धेतील पहिल्या तीन सामन्यात विजय मिळवल्यानंतर आज ग्रुप स्टेजमधील शेवटचा सामना खेळला. सामन्यात जपानवर 5-3 च्या फरकाने विजय मिळवत ग्रुप स्टेजमध्ये ऑस्ट्रेलिया पाठोपाठ दुसरं स्थान कायम ठेवलं. या विजयासोबतच भारतीय संघाने उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवलं असून 1980 ओलिम्पिकनंतर पहिल्या वेळीच भारतीय संघ ग्रुप स्टेजमध्ये दुसऱ्या स्थानावर राहिला.

भारतीय संघाने पहिल्या क्वॉर्टरमध्येच यश मिळवलं. 12 व्या मिनिटाला हरमनप्रीतने पेनल्टी कॉर्नरवर जबरदस्त गोल करत 1-0 ची आघाडी मिळवली. त्यानंतर 17 व्या मिनिटाला भारतीय संघाकडून गुरजंत सिंगने आणखी एक गोल करत सामन्यात 2-0 ची आघाडी घेतली. त्यानंतर दोन मिनिटातच जपानने गोल करत 19 व्या मिनिटाला केंटा तनाकाने  स्कोरलाइन 2-1 मध्ये बदलली. तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये जपानने आणखी एक गोल (31 व्या) करत सामन्यांत 2-2 ची बरोबरी साधली. त्यानंतर 34 व्या मिनिटाला भारताच्या शमशेरने आणखी एक गोल करत 3-2 ने भारताला आघाडी मिळवून दिली.

गुरजंतने ठोकला निर्णयाक गोल

सामन्यात शेवटच्या क्वॉर्टरमध्ये दोन्ही संघानी उत्तम खेळाचं दर्शन घडवलं. भारतीय संघाने पटापट गोल करत सामन्यात विजयी आघाडी घेतली. 51 व्या मिनिटाला नीलकांतने भारतासाठी चौथा गोल केला त्यानंतर 56 व्या मिनिटाला गुरजंतने आणखी एक गोल करत भारताला 5 गोल्सची तगडी आघाडी घेऊन दिली. ज्यानंतर जपानच्या संघाने दोन आणखी गोल केले मात्र भारताची आघाडी अधिक असल्याने भारताने 5-3 च्या फरकाने सामना खिशात घातला.

इतर बातम्या:

Tokyo Olympics 2021: पीव्ही सिंधूचा यामागुचीवर विजय, सेमी फायनलचं तिकीटं मिळवत पदकाच्या अगदी जवळ

Tokyo Olympics 2021: बॉक्सर लवलीनाचं पदक निश्चित, सेमीफायनलमध्ये टर्कीच्या बॉक्सरशी भिडणार

Tokyo Olympics 2021: भारताला मोठा झटका, मेरिकोमचा पराभव; ऑलम्पिकमधील दुसऱ्या पदकाच्या आशा संपल्या

(Indian men hockey team beat japan 5-3 in Last group match at tokyo olympics)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.