Tokyo Olympics 2021: सिंधू, दीपिका कुमारी, पूजा रानीची चमकदार कामगिरी, हॉकी टीमकडून मात्र निराशा, भारतासाठी आजचा दिवस दिलासादायक

भारतासाठी आजचा दिवस संमिश्र ठरला. दिवसाची सुरुवात महिला हॉकी संघाच्या पराभवाने झाली असली तरी नंतर मात्र सिंधू, दीपिका कुमारीसह पुजा रानीने चमकदार कामगिरी केली.

Tokyo Olympics 2021: सिंधू, दीपिका कुमारी, पूजा रानीची चमकदार कामगिरी, हॉकी टीमकडून मात्र निराशा, भारतासाठी आजचा दिवस दिलासादायक
भारताचा आजच्या दिवसाचा लेखाजोखा
Follow us
| Updated on: Jul 28, 2021 | 6:28 PM

Tokyo Olympics 20-2021 : टोक्यो ओलिम्पिकच्या (Tokyo Olympics-2020) सहाव्या दिवसाचे सर्व सामने संपले असून आजचा दिवस भारतासाठी आशादायी ठरला. काही पराभव सोडले तर भारताच्या वंडर वुमन्सनी उत्तम कामगिरी करत पदकाच्या दिशेने आगेकूच केली. यामध्ये बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू, बॉक्सर पुजा रानी आणि तिरंदाज दीपिका कुमारी यांच्या विजयाचा समावेश असून महिला हॉकी संघाला मात्र सलग तिसऱ्या पराभावाला सामोरं जावं लागलं तर नेमका आजचा दिवस कसा होता याचा सविस्तर लेखाजोखा –

हॉकीमध्ये ग्रेट ब्रिटेनकडून पराभव

आजच्या दिवसाची सुरुवातच पराभवाने झाली. भारतीय महिला हॉकी संघाला स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यातही पराभवच पत्करावा लागला. पहिल्या सामन्यात नेदरलँडने 1-5 ने मात दिली. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात जर्मनीने 2-0 ने नमवल्यानंतर आजच्या तिसऱ्या सामन्यात ग्रेट ब्रिटेनकडूनही 4-1 ने भारतीय महिलांना पराभव पत्करावा लागला.

सिंधूची बाद फेरीत धडक, प्रणीतचा मात्र पराभव

पीव्ही सिंधूने स्पर्धेतील दुसऱ्या विजयासह बाद फेरीत धडक घेतली आहे. तिने हाँग काँगच्या चीयूंगा नगनला मात दिली. सिंधूने 21-9, 21-16 अशा सरळ दोन सेट्समध्ये सामना जिंकला. केवळ 35 मिनिटात सामना संपवत सिंधूने स्पर्धेत दुसरा विजय मिळवला. याआधी इस्त्रायलच्या पोलिकारपोवा कसेनियाला 21-7, 21-10 अशा फरकाने सिंधूने मात दिली होती.  पुरुष एकेरीत मात्र ग्रुप-डीच्या सामन्यात भारताच्या बी. साई. प्रणीतला नेदरलँड्च्या मार्क काउलजोवने 21-14, 21-14 च्या फरकाने नमवला.

तिरंदाजीत दीपिकाची कमाल, प्रवीण मात्र पराभूत

तिरंदाजीमध्ये पुरुष ऐकरी स्पर्धेत भारताचा तरुणदीप रॉयने पहिल्या सामन्यात यूक्रेनच्या ओलेक्सी हनबिनला 6-4 ने मात दिली. पण दुसऱ्या सामन्यात इटलीच्या इताय शौनीने तरुणदीपला 6-5 ने पराभूत करत स्पर्धेबाहेर केलं. दुसरीकडे महाराष्ट्राचा सुपुत्र प्रवीण जाधवलाही पहिल्या सामन्यात आरओसीच्या  गालसन बाजारझापोवला 6-0 ने नमवण्यात यश आलं. पण दुसऱ्या सामन्यात अमेरिकेच्या एलिसन ब्राडीने प्रवीणला 6-0 ने नमवलं.

दुसरीकडे महिलांमध्ये दीपिका कुमारीने पहिल्या सामन्यार कर्माला 6-0 ने आणि दुसऱ्या सामन्यात अमेरिकेच्या जेनिफर फर्नांडेजला  6-4 ने मात देत पुढील फेरी गाठली.

बॉक्सींगमध्ये पूजा रानी चमकली

भारताची महिला बॉक्सर पूजा रानीने 75 किलोग्राम वर्गात अल्जीरियाच्या चाईब हिला नमवत राउंड-16 मधून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. तिने हा सामना 5-0 जिंकला. पूजा आणि लवलीना या दोन्ही भारतीय महिला बॉक्सर उपांत्यपूर्व फेरीत पोहचल्या आहेत. त्यामुळे आता दोघींही आपआपल्या गटात अंतिम  8 मध्ये गेल्याने त्यांना पदकासाठी केवळ एक सामना जिंकणे महत्त्वाचे आहे. कारण उपांत्य फेरीत पोहोचणाऱ्य़ा चारही खेळाडूंना किमान कांस्य पदक दिले जाते असा नियमच बॉक्सिंगमध्ये आहे.

हे ही वाचा

Tokyo Olympics 2021: पीव्ही सिंधूचं पदकाच्या दिशेने आणखी एक पाऊल, दुसरा सामना जिंकत बाद फेरीत दाखल

Tokyo Olympics 2021 : भारतीय महिला हॉकी संघाचा ऑलिम्पिक प्रवास खडतर, सलग तिसऱ्या पराभवाचा सामना, ग्रेट ब्रिटेनने 4-1 ने नमवलं

(Indian players todays 6th days Olympic performance satisfactory pooja rani pv sindhu deepika kumari Won matches)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.