Tokyo Olympics पूर्वी भारताला झटका, सर्वोत्कृष्ट धावपटूला दुखापत

जगातील सर्वांत मानाची स्पर्धा असणाऱ्या ऑलम्पिक स्पर्धा यंदा जपानच्या टोक्यो येथे पार पडणार आहेत. दरम्यान भारत ही आपल्या अव्वल दर्जाच्या खेळाडूंना घेऊन स्पर्धेत उतरणार असतानाच भारताची आघाडीच्या धावपटूला दुखापत झाल्याने भारताला स्पर्धेआधीच झटका बसला आहे.

Tokyo Olympics पूर्वी भारताला झटका, सर्वोत्कृष्ट धावपटूला दुखापत
hima das running
Follow us
| Updated on: Jun 30, 2021 | 2:40 PM

नवी दिल्ली : संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या ऑलम्पिक स्पर्धा (Tokyo Olympics ) यंदा जपानच्या टोक्यो शहरात पार पडणार आहेत. जगभरातील देश या स्पर्धेत भाग घेत असून ऑलम्पिकमध्ये जास्तीत जास्त पदकं मिळवण्याचं प्रत्येक देशाचं स्वप्न असते. दरम्यान भारतही आपल्या अव्वल दर्जाच्या खेळाडूंना घेऊन स्पर्धेत उतरणार आहे. ऑलम्पिक स्पर्धा सुरु होण्याआधीच भारताला एक झटका बसला असून भारताची आघाडीची धावपटू हिमा दासला (Hima Das) दुखापत झाली आहे.

हिमा पटियाला येथे पार पडणाऱ्या राष्ट्रीय अंतर-राज्य एथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये शनिवारी 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत मांसपेशींमध्ये ताण पडल्याने दुखापतग्रस्त झाली. किती गंभीरत दुखापत आहे याबद्दल अजून कळू शकलेले नाही. मात्र भारतीय एथलेटिक्स महासंघाने त्यांच्या ट्विटर हँडलवर माहिती देत, ‘हिमा दास अंतर-राज्यीय 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत दुखापतग्रस्त झाली असून आशा आहे ती लवकरात लवकर ठिक व्हावी.’’

टोक्योची स्वप्न धोक्यात

प्रत्येख खेळाडूला ऑलम्पिक स्पर्धेमध्ये पदक पटकावयचं असतं. हिमाचंही हेच स्वप्न आहे. पण स्पर्धा ऐन तोंडावर असताना हिमा दुखापतग्रस्त झाल्याने टोक्यो ऑलम्पिकसाठी घेण्.यात येणाऱ्या पात्रता सामन्यातही ती खेळण्याची शक्यता कमी झाली आहे.ही पात्रता फेरी हिमा पार न करु शकल्यास तिचं टोक्यो ऑलम्पिकमध्ये खेळून पदक मिळवण्याचं स्वप्न अधुरं राहिल.

दुखापतींचा सिलसिला सुरुच

हिमा ही मागील बराच काळापासून दुखापतींमुळे त्रस्त आहे. तिने आयजीपी चारमध्ये  200 मीटरमध्ये सर्वश्रेष्ठ 22.88 सेकंदाचं रेकॉर्ड केल होतं. पात्रतेसाठी गरजेचे असणारे 22.80 सेकंदाचे रेकॉर्डच्या हिमाच्या रेकॉर्डच्या अत्यंत जवळ होते. दरम्यान यंदा होणाऱ्या ऑलम्पिक स्पर्धेत हिमासह दुतीला देखील क्वालीफाय करण्याची संधी आहे.

हे ही वाचा :

Photo : टोक्यो ऑलिम्पिक 2021 मधून ‘या’ दिग्गज टेनिसपटूंची माघार, प्रत्येकाची कारण वेगवेगळी

Euro 2020 : रोनाल्डोच्या विक्रमाने पोर्तुगालची विजयी सुरुवात, जर्मनी मात्र फ्रान्सकडून पराभूत

Euro 2020 : चेक रिपब्लिकचा स्कॉटलंडवर विजय, स्लोवाकियाचीही विजयी सुरुवात

(Indian Sprinter Hima Das injured Before Tokyo Olympics)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.