Tokyo Olympic 2021 : भारताने पटकावली दोन पदकं, रवी दहियासह हॉकी संघाची ऐतिहासिक कामगिरी, असा होता आजचा दिवस

भारतासाठी आजचा दिवस ऑलिम्पिक खेळात ऐतिहासिक ठरला. भारतीय हॉकी संघाने तब्बल 41 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पदक पटकावलं. तर दुसरीकडे रवी दहियाने देखील रौप्य पदकाची कमाई केली.

Tokyo Olympic 2021 : भारताने पटकावली दोन पदकं, रवी दहियासह हॉकी संघाची ऐतिहासिक कामगिरी, असा होता आजचा दिवस
भारताचा टोक्यो ऑलिम्किमधील आजच्या दिवसाचा लेखाजोखा
Follow us
| Updated on: Aug 05, 2021 | 7:52 PM

Tokyo Olympics 2021 : टोक्यो ऑलिम्पिकमध्ये  (Tokyo Olympics-2020) आजचा म्हणजेच 5 ऑगस्ट रोजीचा दिवस भारतीय हॉकीच्या इतिहासांत सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल. एकेकाळी एकहाती मक्तेदारी असणऱ्या हॉकी खेळात मागील तब्बल 41 वर्षे भारताला साधं उपांत्य फेरीतही पोहचता आलं नव्हतं. पण यंदा मात्र भारतीय पुरुष हॉकी संघाने (Indian Men’s Hockey Team) हा दुष्काळ संपवत कांस्य पदक देशाला मिळवून दिलं. 1980 मध्ये मॉस्को ओलिम्पिकनंतर यंदा भारतीय हॉकी संघाने पदक मिळवलं आहे. दुसरीकडे पैलवान रवि दहियाने देखील रौैप्यपदकाची कमाईकरत भारताची पदक संख्या 5 केली.

आतापर्यंत भारताने टोक्य ऑलिम्पिकमध्ये 5 पदकं मिळवली असून 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमधील स्वत:च्याच 6 पदकांच्या विक्रमांपासून भारतीय खेळाडू केवळ एक पदक दूर आहे. भारतीय महिला हॉकी संघ उद्या (6 ऑगस्ट) ग्रेट ब्रिटनसोबत कांस्य पदकासाठी लढणार आहे. तसेच महिला गोल्फर अदिती देखील चांगला खेळ दाखवत असल्याने लवकरच भारताची पदकसंख्या वाढण्याची शक्यता आहे.

हॉकीमध्ये ‘चक दे इंडिया’

भारतासाठी आजच्या दिवसाची सर्वात आनंदाची बातमी ठरली भारतीय पुरुष हॉकी संघाचा विजय. तब्बल 41 वर्षानंतर ऑलिम्परिकत पदक मिळवल्यानंतर भारतीय हॉकी संघाने एकच जल्लोष केला. अत्यंत अटतटीच्या सामन्यात भारत सुरुवातीला 1-3 ने पिछाडीवर होता. त्यानंतर मात्र अवघ्या आठ मिनिटांत चार गोल करत भारचाने विजयी आघाडी घेतली. सामन्याच्या अखेरीस जर्मनीला एक गोल करता आला ज्यामुळे भारत 5-4 च्या फरकाने विजयी झाला. सामन्यात  सिमरनजीत सिंगने दोन (17 आणि 34 व्या मिनिटाला), हार्दिक सिंग (27 व्या मिनिटाला), हरमनप्रीत सिंग (29 व्या मिनिटाला) आणि रूपिंदर पाल सिंगने प्रत्येकी एक-एक गोल केला. भारताचा गोलकीपर श्रीजेशने उत्कृष्ट गोलकिपींग केली.

रवीच्या खिशात रौप्य पदक

भारताचा पैलवान रवी कुमार दहिया अगदी स्वप्नवत कामगिरी करत ऑलिम्पिकच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला होता. रवीने सेमीफायनलमध्ये कझाकिस्तानच्या सनायेव नुरिस्लामला मात देत अंतिम सामन्याचं तिकीट मिळवलं होतं. त्याची यंदाच्या स्पर्धेतील कामगिरी पाहता तो भारताचा सुवर्णपदक नक्कीच मिळवून देईल असे वाटत होते. त्याने अंतिम सामन्यात खेळही तसाच केला. अगदी चुरशीच्या झालेल्या सामन्यात अखेर वेळेची मर्यादा असल्चाने रवी 3 गुणांनी कमी पडला आणि 7-4 ने त्याच्या हातातून सुवर्णपदक निसटलं. ज्यामुळे त्याला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं.

कुस्तीमध्येच पैलवान दीपक पूनियाकडे देखील 86 किलो वजनी गटात कांस्य पदक मिळवण्याची संधी होती. पण कांस्य पदकासाठीच्या लढतीत त्याचा 4-2 अशा छोट्याशा फरकाने पराभव झाला. सामन्याच्या सुरुवातीलाच दीपकने उत्तम खेळ दाखवत आघाडी घेतली होती. पण जसजसा सामना पुढे गेला अमिने यानेदेखील आक्रमक खेळ दाखवला. ज्यानंतर अखेरची 10 सेकंद शिल्लक असताना अमिनेने आपला शेवटचा डाव टाकत सामना 4-2 ने विजयी केला. ज्यामुळे सॅन मरीनोच्या एम. एन. अमिने (M.N. Amine) याने देशासाठी पहिले वहिले ऑलिम्पिक पदक पटकावले.

गोल्फमध्ये अदितीची दिलासादायक कामगिरी

भारताची गोल्फर अदिती अशोक (Aditi Ashok) गोल्फ खेळात दिलासादायक प्रदर्शन करत असून दुसऱ्या राउंडच्या अखेरीस ती  संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहे. दोन राउंडनंतर तिचा एकूण स्कोर 133 आहे. दुसऱ्या स्थानावर अदितीसोबत डेन्मार्कची नेना कोर्स्ट्ज मॅडसन आणि एमिली क्रिस्टीन पेडरसन आहेत. मॅडसन पाच स्थानांची बढत घेऊन दुसऱ्या स्थानावर आली आहे. तर  पेडेरसन 14 स्थानांची बढत घेत पुढे आली आहे. मॅडसनने पहिल्या राउंडमध्ये 69 तर दुसऱ्या राउंडमध्ये 70 गुण मिळवले. अदिती पहिल्या राउंडमध्ये 67 आणि दुसऱ्या राउंडमध्ये 66 गुण मिळवले आहेत.

एथलेटिक्समध्ये भारताची स्थिती बिकट

एथलेटिक्समध्ये आज भारताच्या तीन खेळाडूंनी 20 किमी रेस वॉकमध्ये सहभाग घेतला होता. यामध्ये सुरुवातीला संदीप कुमारने चांगली कामगिरी केली पण जसजशी रेस संपत भारताचे तिन्ही खेळाडू पिछाडीवर पडले. शर्यतीत इटलीच्या मासिमो स्टेनो याने सुवर्णपदक पटकावलं. भारताचा राहुल 47 व्या, केटी इरफान 51 व्या आणि संदीप कुमार 53 व्या स्थानावर राहिले.

हे ही वाचा :

रवी दहियाचं गोल्ड हुकलं, तिहार जेलमध्ये सुशीलकुमारला अश्रू अनावर

Tokyo Olympic 2021 : पैलवान रवी दहियाची धडाकेबाज कामगिरी, कुस्तीत रौप्य पदकाची कमाई

Tokyo Olympic 2020 : ‘चक दे इंडिया’, 41 वर्षानंतर हॉकीमध्ये पदक, भारताचा जर्मनीवर 5-4 ने विजय

(Indian teams performance on 5th august at Tokyo Olympic indian mens hockey team won bronze ravi dahiya won silver)

Non Stop LIVE Update
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.