Tokyo Olympics 2021 : मीराबाई चानूने रचला इतिहास, वेटलिफ्टिंगमध्ये भारताला टोक्‍यो ऑलिम्पिकमधील पहिलं पदक

भारताला यंदाच्या ऑलिम्पिकमधलं पहिलं मेडल वेटलिफ्टर मीराबाई चानूने मिळवून दिलं आहे. वेटलिफ्टिंगच्या स्नॅच राउंडमध्ये 87 किलो वजन आणि क्लीन अँड जर्कमध्ये 115 किलो वजन उचलत मीराबाईने रौप्य पदक खिशात घातलं आहे.

Tokyo Olympics 2021 : मीराबाई चानूने रचला इतिहास, वेटलिफ्टिंगमध्ये भारताला टोक्‍यो ऑलिम्पिकमधील पहिलं पदक
मीराबाई चानूने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक मिळवलं आहे.
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: shashank patil

Jul 24, 2021 | 12:45 PM

Tokyo Olympics 20-2021 : टोक्यो ऑलिम्पिकचा (Tokyo Olympic) आज दुसराच दिवस असून भारताने पहिलं पदक खिशातही घातलं आहे. भारताची आघाडीची वेटलिफ्टर मीराबाई चानूने (Mirabai Chanu)  वेटलिफ्टिंगमध्ये दुसरा क्रमांक पटकावत भारताला रौप्य पदक (India won Silver at tokyo) मिळवून दिलं आहे. मीराबाई चानूने ही कमाल 49 किलोग्राम महिला वर्गात केली आहे. तिने स्नॅच आणि क्लीन अँड जर्क राउंडमध्ये मिळून तब्बल 202 किलो वजन उचलत रौप्य पदक पटकावलं आहे. मीराबाईने स्नॅच राउंडमध्ये 87 किलो तर क्लीन अँड जर्कमध्ये 115 किलो वजन उचलत हे यश मिळवलं. तर 49 किलोग्राम वर्गात चीनच्या जजिहु हिने सुवर्ण पदक पटकावलं आहे.

49 किलोग्राम वर्गात महिला वेटलिफ्टिंगची सुरुआत स्नॅच राउंडने झाली. ज्यात मीराबाईने पहिल्या प्रयत्नात 81 किलोग्राम वजन उचललं. ज्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात 87 किलोग्राम वजन उचलंल. तिसऱ्या प्रयत्नात तिने 89 किलोग्राम वजन उचलण्याचा प्रयत्न केला पण ती अयशस्वी ठरली आणि केवळ 87 किलोग्रामच उचलू शकली. त्यामुळे स्नॅच राउंडमध्ये ती दुसरी आली. त्यात चीनच्या जजिहु हिने 94 किलो वजन उचलत पहिला क्रमांक पटकावला.

क्लिन अँड जर्कमध्ये 115 किलो उचलत पटकावलं पदक

त्यानंतर क्लीन अँड जर्क राउंडची सुरुवात झाली आमि मीराबाईने पहिल्या प्रयत्नातच अप्रतिम कामगिरी करत 110 किलो वजन उचलला. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात 115 किलो वजन उचललं. पण अखेरच्या तिसऱ्या प्रयत्नात 117 किलो वजन उचलण्यात ती अयशस्वी ठरली. ज्यामुळे तिला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. तर चीनच्या जजिहुने क्लीन अँड जर्कमध्ये 116 किलो वजन उचलत सुवर्ण पदक जिंकलं.

मीराबाईने रचला इतिहास

मीराबाई चानूने हे रौप्य पदक पटकावत ऑलिम्पिक्स खेळात महिला वेटलिफ्टिंगमध्ये भारताला इतिहासातील दुसरं  पदक मिळवून दिलं. याआधी  2000 साली सिडनी ऑलम्पिकमध्ये कर्नम मल्लेश्वरी हिने पदक जिंकलं होतं. ऑलम्पिकमध्ये सिल्वर जिंकणारी मीराबाई ही बॅडमिंटन स्टार पी.व्ही सिंधूनंतर पहिली भारतीय महिला आहे. तिच्या या कामगिरीचं सर्व स्तरातून कौैतुक होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

पद्मश्री मीराबाई चानू

26 वर्षीय मीराबाई ही मूळची मनिपूर राज्यातील असून तिचं संपूर्ण नाव साइखोम मीराबाई चानू असं आहे. ती भारताची आघाडीची महिला वेट लिफ्टर आहे. 2018 मध्ये तिला भारत सरकारने राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने देखील सन्मानित केलं होतं. 2018 मध्ये तिला क्रीडा विभागातून पद्मश्री पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला होता.

हे ही वाचा :

Tokyo Olympics 2021 : 24 जुलै भारतासाठी यंदाच्या ऑलिम्पिकमधील महत्त्वाचा दिवस, ‘हे’ आहे कारण

(Indian weightlifter Chanu Saikhom Mirabai finishes in second place Won Silver medal For india First Tokyo Olympic Medal for India)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें