पदक नाही म्हणून काय झालं, तुमच्या कर्तृत्वाची प्रेरणा लाखमोलाची, नरेंद्र मोदींशी बोलताना महिला हॉकी टीम गहिवरली

"पदक येऊ शकलं नाही, मात्र तुम्ही घाम गाळल्याने देशातील कोट्यवधी मुलींना प्रेरणा मिळाली आहे. मी हॉकी संघातील सर्व साथीदार आणि प्रशिक्षकांचं अभिनंदन करतो" असं मोदी म्हणाले.

पदक नाही म्हणून काय झालं, तुमच्या कर्तृत्वाची प्रेरणा लाखमोलाची, नरेंद्र मोदींशी बोलताना महिला हॉकी टीम गहिवरली

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भारतीय महिला हॉकी संघाच्या (Indian Women’s Hockey Team) खेळाडूंशी फोनवरुन बातचित केली. पंतप्रधानांचे कौतुकाचे बोल ऐकून महिला हॉकीपटूंचे डोळे पाणावले. पंतप्रधानांनी खेळाडूंना प्रोत्साहन देत त्यांच्या खिलाडू वृत्तीची तारीफ केली. फोनवरील संवादावेळी महिला हॉकीपटूंचे भाव कॅमेरात कैद झाले आहेत.

नरेंद्र मोदी काय म्हणाले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय महिला हॉकी संघाच्या खेळाडूंशी बोलताना त्यांच्या कामगिरीचं कौतुक केलं. “पदक येऊ शकलं नाही, तुमच्या कर्तृत्वाची प्रेरणा लाखमोलाची आहे. तुम्ही घाम गाळून केलेल्या कामगिरीमुळे देशातील कोट्यवधी मुलींना प्रेरणा मिळाली आहे. मी हॉकी संघाचे सर्व सहाय्यक आणि प्रशिक्षकांचं अभिनंदन करतो” असं मोदी म्हणाले.

नवनीत कौरला झालेल्या दुखापतीविषयी नरेंद्र मोदींनी आस्थेने चौकशी केली. नवनीतच्या डोळ्याला दुखापत झाली असून 4 टाके पडल्याचं क्रीडापटूंनी मोदींना सांगितलं. “तुम्ही निराश होऊ नका, देशाला तुमचा अभिमान आहे. तुमच्या मेहनतीमुळे हॉकीला पुनरुज्जीवन मिळत आहे” अशा भावनाही मोदींनी व्यक्त केल्या

भारतीय महिला संघानं मनं जिंकली

भारतीय हॉकीच्या महिलांनी खेळाडूंनी उपांत्य फेरी गाठून इतिहासात आपले नाव नोंदवले. भारतीय महिला संघाचे हे केवळ तिसरे ऑलम्पिक होते. भारतीय महिला खेळाडूंनी त्यांच्या खेळाद्वारे सगळ्यांना संमोहित केलं. कांस्यपदकाच्या रोमांचक सामन्यात ग्रेट ब्रिटनने भारताला 4-3 ने पराभूत केले. दोन गोलने पिछाडीवर पडल्यानंतर भारताने पुनरागमन केलं होतं. भारतीय महिला संघानं 3-2 अशी आघाडी घेतली होती. पण पदकावर नाव कोरण्यात त्यांना अपयश आलं.

भारतीय महिला संघाने पाच मिनिटांत तीन गोल केले. गुरजीत कौरने 25 व्या आणि 26 व्या मिनिटाला तर वंदना कटारियाने 29 व्या मिनिटाला गोल केला. ब्रिटनसाठी एलेना रेयर (16 वा), सारा रॉबर्टसन (24 वा), कर्णधार होली पियर्न वेब (35 वा) आणि ग्रेस बाल्डसन यांनी 48 व्या मिनिटाला गोल केले.

पंतप्रधान मोदींच्या ट्विटरवरुन शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही महिला हॉकी संघाला प्रोत्साहन देणारे ट्विट केले होते. टोकियो 2020 मध्ये आमच्या महिला हॉकी संघाची महान कामगिरी आम्ही नेहमी लक्षात ठेवू. त्यांनी आपला सर्वोत्तम खेळ केला, असं नरेंद्र मोदी म्हणाले. संघातील प्रत्येक सदस्याची कामगिरी उल्लेखनीय आहे. भारताला या अद्भुत संघाचा अभिमान आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

लढता लढता हरल्या

दरम्यान, टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला संघाला ग्रेट ब्रिटनने 4-3 ने पराभूत केलं. त्यामुळे भारतीय महिला हॉकी संघाचं कांस्य पदकाचं स्वप्न भंगलं. असं असलं तरी राणी रामपालच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने सेमी फायनलपर्यंत मजल मारुन ऐतिहासिक कामगिरी केली. भारतीय महिला संघ ज्या पद्धतीने खेळला, त्याचं देशभर कौतुक होत आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

महिला हॉकी संघातील हरयाणाच्या खेळाडूंना बक्षिस, प्रत्येकी 50 लाख रुपये देऊन होणार सन्मान

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI