Tokyo 2020: हॉकीच्या मैदानात भारताचे धुरंदर उतरणार, सेमीफायनलमध्ये जागा मिळवण्यासाठी लढणार, असे असेल 1 ऑगस्टचे वेळापत्रक

1 ऑगस्ट रोजी महिला बॅडमिंटन एकेरीच्या सामन्यावर सर्व भारतीयांचे लक्ष होते. पण सिंधू आज सेमी फायनलमध्ये पराभूत झाल्याने भारतीयांच्या आशा मावळल्या आहेत.

Tokyo 2020: हॉकीच्या मैदानात भारताचे धुरंदर उतरणार, सेमीफायनलमध्ये जागा मिळवण्यासाठी लढणार, असे असेल 1 ऑगस्टचे वेळापत्रक
भारतीय हॉकी संघ
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: shashank patil

Jul 31, 2021 | 6:28 PM

Tokyo Olympics 20-2021 : टोक्यो ओलिम्पिक (Tokyo Olympic) ऐन रंगात आली असून भारताने दोन पदकंही खिशात घातली आहेत. मात्र आजचा (31 जुलै) दिवस भारतासाठी निराशाजनक ठरला. यात बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूचा (PV Sindhu) सेमीफायनलमधील पराभव भारतासाठी सर्वात मोठी निराशा ठरला. पण उद्याचा दिवस भारतासाठी महत्त्वाचा असून पुरुष हॉकी संघासह (Men’s Hockey), अॅथलेटिक्स (Athletics) आणि बॉक्सिंग (Boxing) या खेळांमध्ये भारतीय खेळाडू मैदानात दिसतील.

भारतीयांसाठी उद्या सुपर संडेचा महत्त्वाचा सामना पुरुष हॉकी संघाचा क्वॉर्टर फायनलचा सामना असेल. भारतीय हॉकी संघ तब्बल 41 वर्षानंतर सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. क्वॉर्टर फायनलमध्ये भारताचा सामना ग्रेट ब्रिटेनसोबत असेल. ग्रेट ब्रिटन संघाची आतापर्यंतची कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. पण भारतानेही चुरशीची टक्कर दिल्याने उद्याचा सामना चुरशीचा होईल हे नक्की

पुरुष हॉकी संघाची ऐतिहासिक कामगिरी

प्रशिक्षकग ग्राहम रीड आणि कर्णधार मनप्रीत सिंग यांच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघाने ग्रुप स्टेजमध्ये अप्रतिम  प्रदर्शन घडवलं. ग्रुप स्टेजमध्ये ऑस्ट्रेलिया संघ सोडता भारताने सर्व प्रतिस्पर्ध्यांना धोपीपछाड केलं. अशीच कामगिरी भारत रविवारच्या क्वॉर्टर फायनलमध्ये करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. में होगी. भारत जर उद्याचा सामना जिंकले तर 1980 च्या मॉस्को ओलिम्पिकनंतर पहिल्यांदा म्हणजेच 41 वर्षानंतर सेमीफायनलमध्ये जागा मिळवेल.

बॉक्सिंगमध्ये सतिश कुमारकडून आशा

हॉकीसह रविवारी बॉक्सिंग रिंगमध्येही भारतीय खेळाडू सतॉश कुमार जिंकण्यासाठी उतरेल. सतिश ओलिम्पिकमध्ये त्याचा डेब्यू करत असून राष्ट्रीय पातळीवर त्याने चांगली कामिगिरी केल्याने त्याच्याकडून विजयाची अपेक्षा केली जात आहे. हॉकी आणि बॉक्सिंगसह भारत उद्या काही अॅथलेटिक्सच्या स्पर्धांमध्येही सहभाग घेईल.

इतर बातम्या:

Tokyo Olympics 2021: पीव्ही सिंधूचा सेमीफायनलमध्ये पराभव, भारताचं सुवर्णपदकाचं स्वप्न भंगलं

Tokyo Olympics 2021: बॉक्सर लवलीनाचं पदक निश्चित, सेमीफायनलमध्ये टर्कीच्या बॉक्सरशी भिडणार

Tokyo Olympics 2021: भारताला मोठा झटका, मेरिकोमचा पराभव; ऑलम्पिकमधील दुसऱ्या पदकाच्या आशा संपल्या

(Indias 1st august Schedule of Tokyo Olympics)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें